रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन


रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन


मुंबई : कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.


लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.  रेशनिंग साठीच्या तक्रारीसाठी/रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवा, असे आवाहन जनतेस करण्यात आले आहे.


राज्यस्तरीय हेल्पलाईन ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार असून त्याचा हेल्पलाईन क्रमांक : 1800 22 4950/1967 (नि:शुल्क) आहे. अन्य हेल्पलाईन क्रमांक : 022- 23720582 / 23722970 / 23722483, ईमेल- helpline.mhpds@gov.in, ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी mahafood.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली याचा वापर करा. तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून  हा कक्ष सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहील. त्याचा हेल्पलाईन क्रमांक- 022-22852814,ईमेल- dycor.ho.mum@gov.in असा आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image