पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरी जाऊन रक्कम अदा करणार : जिल्हाधिकारी शेखर सिंह


पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरी जाऊन रक्कम अदा करणार : जिल्हाधिकारी शेखर सिंह


सातारा : जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची गावनिहाय यादी जिल्हा अग्रणी बँकेकड़े त्वरित सादर करावी. ही यादी  जिल्हा अग्रणी बँकेने एकत्र करून सातारा पोस्ट पेमेंट बँकेकड़े जमा करावी. पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातुन लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन AEPS मशीनद्वारे पोस्टमन रक्कम अदा करणारआहेत. यामुळे नागरिकांना घरपोच पैसे मिळू शकणार आहेत. त्यामुळे बँकेत जाऊन गर्दी करण्याची आवश्यकता नाही. नागरीकांनी घराबाहेर न पड़ता प्रशासनास मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.


कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नागरीकांसाठी सर्वच बँका  व्यापारी, राष्ट्रीयकृत, प्रायव्हेट, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती, को-ऑप बँका व पतसंस्था यांची वेळ  एकसमान सकाळी ८ ते ११ अशी करण्यात  आली आहे.     नागरिकांनी बँकामध्ये न जाता, जिल्ह्यामध्ये असणा-या १०३८ बँक व्यवसाय प्रतिनिधीद्वारे आवश्यकता असेल तरच पैसे काढावेत त्यांचीही वेळ सकाळी ८ ते ११ अशी करण्यात आलेली आहे. त्याशिवाय जिल्ह्यात एकूण ४६८ एटीएम सेंटर आहेत, त्याचा महिलांनी व नागरिकांनी वापर करावा.  नागरीकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, जनधन खातेदार महिलांना तसेच शेतक-यांना अत्यंत आवश्यकता असेल तरच पैसे काढ़ता येणार आहेत. या कालावधीमध्ये सर्वानी बँकत गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंग अंतर ठेवायचे असून सर्वानी मास्क वापरणे बंधनकारक राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.