रिक्षा - टॅक्सी चालकांना रोजगार भत्ता द्या
कराड - रिक्षा व टॅक्सी चालकांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देण्यात आले आहे. शिवसेना कराड शहर उपप्रमुख अक्षय राजेंद्र कुरकुले(गवळी) यांनी पत्र दिले आहे.
कोरोनामूळे देशात गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन सुरू आहे. सर्व रिक्षा चालक मालकआप आपला धंदा बंद करून घरी बसून आहे .हातावरच पोट आसल्यामुळे त्यांच्या बायका मुलांवर उपासमारीची वेळ आलेली आहे दररोज 300 ते 400 रुपये कमावता उद्योगच बंद पडल्यामुळे उपाशीमारण्याची वेळ आली आहे. इतर कुठलेही कमाईचे साधन नसल्यामुळे यावर्गामध्ये प्रचंड निराश व असंतोष पसरला आहे.
सध्या महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने बांधकाम क्षेत्रातील कामगारांना रू२००० ची मदत जाहीर केली आहे त्याच पद्धतीने याही समाजातील उपेक्षित व गरीब असणारे रिक्षा चालक व मालकांसाठी रु ५००० पर्यंत मदत करावी ही विनंती आहे . राज्यातील हजारो कुटुंब आता आपल्या कृपेवरच अवलंबून आहेत. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.