पहिली सकारात्मक बातमी....कोरोना मुक्त महिलेला पुष्पगुच्छ आणि टाळ्या वाजून सोडले घरी


पहिली सकारात्मक बातमी....कोरोना मुक्त महिलेला पुष्पगुच्छ आणि टाळ्या वाजून सोडले घरी


सातारा - सध्या कोरोना व्हायरचा सर्वत्र धुमाकूळ सुरू असताना सातारा जिल्ह्यातही कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.दरम्यान सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेला अखेर कोरोना मुक्त करून आज निरोप देण्यात आला.विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोरुना बाबतची ही पहिली सकारात्मक बातमी असून सदर महिलेला पुष्पगुच्छ देऊन टाळ्या वाजून घरी सोडण्यात आले.


सातारा जिल्ह्याची पहिली कोरोना ( कोविड 19 ) बाधित महिला झाली ठणठणीत बरी...  कोरोना मुक्त जिल्ह्यातली पहिली रुग्ण...  पुष्प गुच्छ देवून आणि टाळ्या वाजवून त्या महिलेला जिल्हा रुग्णालयातून निरोप दिला...कोरोना मुक्त महिलेने रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स  यांचे यावेळी आभार मानले ...  हा निरोप देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर, सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने, डॉ.धुमाळ, डॉ. बक्षी,  डॉ. जाधव, डॉ. देशमुख, डॉ.सुपेकर, डॉ.हिरास,  मेट्रोन श्रीमती चव्हाण यांच्या नर्सिंग स्टाफ, तांत्रिक विभागाचे कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी याचे  कौतुक करून अभिनंदन केले आहे.


Popular posts
"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
विशेष मुलाखत : पुणे आयुक्त दीपक म्हैसेकर सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात करता येईल...
Image