पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे घरातच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे घरातच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


कराड - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात साजरी करण्याचे आवाहन केले आहे. यानुसार आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरांमध्ये साजरी केली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची तत्वे आपणाला बहाल केली आहेत. त्यांच्या विचारांची जोपासना केली जात आहे. अशी प्रतिक्रिया सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त राज्याचे सहकार पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपल्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.


पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जाणार होते. मात्र गर्दी होण्याच्या शक्यतेने त्यांनी तेथे जाणे टाळले. आपल्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन केले. तसेच नागरिकांना कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मेपर्यंत लॉकडाऊन वाढला असून जनतेने यास सहकार्य करण्याचे आवाहन नामदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.Popular posts
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image