चिकन विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 


चिकन विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल


कराड - राजू सियाज मुल्ला वय 40 वर्ष रा शहापूर (ता कराड) हे आपले राहत्या घरासमोर बॉयलर चिकन विक्री करीत असताना व वाजवी कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी रोडवर लोक जमून विनाकारण बॉयलर चिकन विक्री करीत असताना मिळून आल्यामुळे उंब्रज पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


गुन्हा .रजि.न.145/2020 भादविक.188 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51(ब)प्रमाणे राजेंद्र बापूराव साळुंखे यांनी उंब्रज पोलिस स्टेशन फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला 31 मार्च 2020 रोजी सकाळी 12.40 वा शहापूर गावचे हद्दीत आरोपीने राहते घरासमोर सदरचे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी न घेता व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरवण्याची घातक कृती करून कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आपत्ती निवारण कायद्यान्वये जारी केलेल्या आदेशाचा भंग केला म्हणुन गुन्हा दाखल आहे. पुढीलपैकी तपास ASI भोसले हे करीत आहेत.


Popular posts
पुणे जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना वनराईतर्फे शिधावाटप
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
सातारा - पुणे महामार्गावरील खड्डे 15 मार्चपर्यंत बुजवावेत.....पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा
Image
  स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड जाहीर करावे,... डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला गंभीर धोका निर्माण झाला... "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा
Image