कराड येथील दोन नागरिक बाधित तर 171 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

 


कराड येथील दोन नागरिक बाधित तर 171 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह


कराड : वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 2 नागरिकांचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 
आता सातारा जिल्ह्यात 68 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 79 बाधित रुग्ण आढळले आहेत.


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 5, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 152, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 9 असे एकूण 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.