आ. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून गरजूं ५००० कुटुंबांना अन्न धान्य किटचे वाटप....अजून ५००० किटचे लवकरच वाटप केले जाणार


आ. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून गरजूं ५००० कुटुंबांना अन्न धान्य किटचे वाटप....अजून ५००० किटचे लवकरच वाटप केले जाणार


कराड: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत प्रशासनाने खबरदारी करिता अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनाचा प्रादुर्भाव कराड परिसरात अधिक झाल्याने संपूर्ण जिल्हा रेड झोन मध्ये गेला. यामुळे प्रशासनाने कराड परिसरात कडक लॉक डाऊन जाहीर केल्याने लोकांची अत्यावश्यक सेवेबाबत पूर्ण गैरसोय झाली. यासाठीच कराड दक्षिणचे आमदार तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गरजूंपर्यंत अन्न धान्य पोहचविण्याची यंत्रणा उभी केली व ५००० च्या वर कुटुंबियांना घरपोच किट वितरित केले.


अन्न धान्यांच्या किट मध्ये गहूचे पीठ, तांदूळ, डाळ, तेल, साखर, साबण व सॅनिटायझर अश्या जीवनावश्यक वस्तू आहेत. हे जीवनावश्यक अन्न धान्याचे किट कराड शहरातील मुजावर कॉलोनी, कार्वे नाका, मार्केट यार्ड, शनिवार पेठ तसेच कराड ग्रामीण भागातील वनवासमाची, कार्वे, आटके या भागात दिली गेली आहेत. 


आ. पृथ्वीराज बाबांकडून सध्या ५००० कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप केले आहे. पुढील आठवड्यात अजून ५००० कुटुंबाना किटचे वाटप केले जाणार आहे. सध्याचा काळ हा सर्वासाठी अत्यंत बिकट आहे अश्या परिस्थितीत गरजूंपर्यंत अन्न धान्यांचे किट पोहचले पाहिजेत यासाठी आ. पृथ्वीराज बाबांनी काँग्रेस स्वयंसेवकांना सूचना दिल्या आहेत.        


 


 


 


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश