जिल्ह्यात 1 बाधित रुग्णांचा मृत्यू; 1 रुग्ण मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह...मृत्यू प्रश्चात 2 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले
सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे दि. 22 मे रोजी दाखल असलेला अंधोरी ता. खंडाळा येथील 43 वर्षीय (सारीचा रुग्ण) कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच रांजणी ता.जावळी येथील मुंबई वरुन प्रवास करुन आलेल्या 85 वर्षीय महिलेचा मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटिाव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तसेच हडपसर पुणे येथून प्रवास करुन आलेला 27 वर्षीय पुरुष व मुंबई येथून प्रवास करुन आलेला वेळेकामथी ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू प्रश्चात नमुना तपासणी करीता पुणे येथे पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 556 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 223 रुग्ण बरे झाले आहेत.तर 310 रुग्णांवर उपचार सुरु असून 23 जणांचा मृत्यु झालेला आहे.