पत्रकारितेतील सच्चा व प्रामाणिक मित्र सचिन देशमुख



दैनिक सकाळचे उपसंपादक आमचे परमस्नेही मित्र सचिन देशमुख यांचा आज वाढदिवस. सचिन देशमुख हा शांत स्वभावाचा. मितभाषी असला तरी हळव्या मनाचा आहे. तसेच कौटुंबिक वातावरणात रमणारा. कुटुंब वत्सल्य असे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. दरम्यान मित्रांसोबत वैचारिक चर्चेमध्ये रमणारा, तितकाच गप्पागोष्टी करणारा आणि मित्रांच्या परिवारामध्ये वावरणारा, दिलखुलास, सदाबहार, गप्पिष्ट म्हणून सर्वांना सुपरीत आहे. पत्रकारितेच्या संक्रमण अवस्थेतही आपल्या तत्त्वाशी कोणती तडतड न करता, मूळ व्यवसायाशी प्रामाणिक राहणारा सचिन देशमुख शक्यतो वादविवादापासून लांब असतो. वादापेक्षा चर्चेला महत्त्व द्यावे. असे सचिन देशमुखचे मत असते.

पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा सच्चा पत्रकार म्हणून सचिन देशमुख यांची सातारा जिल्हात ओळख आहे. पत्रकारितेमध्ये करिअर करीत असताना पत्रकारितेची तत्त्व, मूल्य जपण्याचा प्रयत्न सचिन देशमुख यांच्याकडून होत आहे. ही अभिमानास्पद, कौतुकासन बाब म्हणावी लागेल. कारण प्रिंट मीडियामध्ये काम करताना अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो. अनेक विषयांबाबत रोज वाचन करावे लागते. आपल्या संपर्कातून जे वृत्त किंवा बातमी, लेख तयार करायचे आहे. त्यासाठी अनेकांशी सुसंवादी साधावा लागतो. हे सर्व गुण सचिन देशमुख यांच्यामध्ये आहेत. पत्रकारिता करीत असताना कोणताही उतावीळपणा, भडकपणा किंवा मी, माझे या भोवती सचिन देशमुख अशा पध्दतीने पत्रकारिता करत नाहीत. लोकाभिमुख, विकासाभिमुख व जनमानसाना आपले वृत्त, बातमी, लेख प्रबोधनात्मक किंवा माहितीपूर्ण असावी. यासाठी त्यांचा अधिकचा कल दिसून येतो.

मूळचा सचिन देशमुख हा शेतकरी कुटुंबातील. मात्र पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतरही सचिन देशमुख यांनी शेतीची नाळ सोडलेली नाही. शेतीपासून दूर गेलेला नाही. शेतीमध्ये जसा वेळ मिळेल तसा जाऊन सचिन काम करीत असतो. केवळ मी पत्रकार आहे. शेतात कसे काम करायचे. असा विचार करत नाही. हे महत्त्वाचे आहे. सचिन देशमुख पत्रकारिता करीत असताना प्रामाणिकपणे करतो. अभ्यासपूर्ण करतो. आपण ज्या संस्थेत काम करतो त्याठिकाणी इमाने इतबारे काम करण्याचा त्याचा स्वभाव आहे. पत्रकारितेचा फायदा व उपयुक्तता समाजाला व्हावी या दृष्टिकोनातून सचिन देशमुख यांची पत्रकारिता सुरू आहे.

विद्यानगर या छोट्याशा डेटलाइनवरून सचिन देशमुख यांची पत्रकारिता सुरू झाली. लोकमत ते सकाळ असा सचिन देशमुख यांचा या दोन वृत्तपत्रांमध्ये पत्रकारितेचा प्रवास अतिशय मनोरंजक व वैविध्यपूर्ण असा आहे. या दोन्ही वृत्तपत्र समूहामध्ये काम करताना त्याला मिळालेले पत्रकार मित्र असतील किंवा पत्रकारितेमध्ये काम करत असताना पत्रकारांच्या समूहातील काही समविचारी पत्रकार मित्र असतील. नेहमी मित्रांच्या संपर्कात राहणे. त्यांच्याशी सर्व विषयांची बोलणे, चर्चा करणे. हा मूळचा सचिनचा स्वभाव आहे. सचिन देशमुख सध्या दैनिक सकाळच्या सातारा येथील कार्यालयामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. अत्यंत व्यस्त दिनचर्या सचिन देशमुखची झाली आहे. कारण कराडून सातारा प्रवास करून दैनिक सकाळचे दिवसभराचे काम करून पुन्हा कराडला येणे. सचिन देशमुख याने पत्रकारितेचा वसा स्वीकारला आहे. तो प्रामाणिकपणे निभावतो आहे. यामुळे सचिन देशमुख हा पत्रकारितेमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्याचबरोबर सचिन देशमुख यांचे बातमीच्या अनुषंगाने ज्यांच्या संपर्कात जातो त्यांच्याशी कायमस्वरूपी सचिन देशमुख यांचा ऋणानुबंध कायम पक्का होत असतो. हे एक सचिन देशमुखचा व्यक्तिमत्वाचा भाग आहे

पत्रकार मित्र म्हणून सचिन देशमुख याच्या बद्दल लिहावे तितके कमीच आहे. कारण सकारात्मक पत्रकारिता करणारा, पत्रकारितेतीला प्रामाणिक मित्र. असा जर कोणाला हवा असेल तर सचिन देशमुख या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिले पाहिजे. कारण नेहमी मित्राच्या सुखदुःखाला धावून येणारा. मित्रांबरोबर सातत्याने संपर्कात राहणारा. कोणताही किंतुपरंतु मनामध्ये न बाळगता मित्रत्वाला पक्का असणारा सचिन देशमुख या मित्राला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.


गोरख तावरे
932671172 / 9616111711