श्री सेवागिरी महाराज रथोत्सव सोहळा...... खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते दिमाखदार सुरुवात


कराड (राजसत्य) सातारा जिल्ह्यातील पुसेगाव (ता.खटाव) येथील श्रद्धास्थान श्री सेवागिरी महाराज यांच्या ७२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रथोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे पूजनाने या सोहळ्याचा शुभारंभ झाला. तसेच भव्य कृषी प्रदर्शनाचे देखील उद्घाटन झाले. श्री सेवागिरी महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुसेगावचे महत्व, सेवागिरी महाराजांबाबत श्रद्धास्थान असणाऱ्या रथोत्सवाची परंपरा याचे आपल्या भाषणात विवेचन केले. याप्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार शशिकांत शिंदे, श्री सुंदरगिरी महाराज, श्री सेवागिरी ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, चंद्रकांत दळवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सोहळ्यानिमित्त श्री सेवागिरी महाराज यांच्या विशेषांकाचे प्रकाशन खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या उत्सवासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.


Popular posts
"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
विशेष मुलाखत : पुणे आयुक्त दीपक म्हैसेकर सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात करता येईल...
Image