श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांचेकडून १६ हजार ५०० वह्यांचे वाटप......शाळा नंबर ३ चा कायापालट होणार : राजेंद्रसिंह यादव

कराड - कराड नगरपालिका क्षेत्रातील नगरपालिकेच्या दहा शाळांमधील विद्यार्थ्याना खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांचेकडून १६ हजार ५०० वह्या देण्यात आल्या. त्याचे वाटप माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. नगरसेविका स्मिता हुलवान, विजय वाटेगावकर, गजेंद्र कांबळे, विनोद भोसले, निशान ढेकळे, प्रशासन अधिकारी नितीन जगताप उपस्थित होते.

यावेळी राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराड शहराला शैक्षणिक वारसा असून गोरगरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शाळांमध्ये शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लावण्यासाठी विविध भौतिक सुविधा व शैक्षणिक साहित्य नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येतात. तसेच शाळा क्र.३ मधील खोल्या बांधकाम यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून शाळेचा कायापालट करण्यात येईल.

कार्यक्रमप्रसंगी नगरपालिका शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.प.शाळा क्र. ३ चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी केले व सूत्रसंचालन संग्राम गाढवे यांनी केले.