शासकीय इतमामात शहीद जवान संदीप सावंत यांना हजारो देशप्रेमींनी साश्रुपूर्ण नयनाने दिला अखेरचा निरोप


कराड (गोरख तावरे) - देश संरक्षणार्थ हुतात्मा झालेले शहीद जवान संदीप सावंत यांना त्यांच्या मूळ गावी मुंढे (ता. कराड) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहिद संदिप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते. कराड शहरातून शहिद संदिप सावंत यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मराठा बटालियनचे जवान संदीप सावंत यांना काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. काश्मीर खोर्‍यातील नौशेरा विभागात ही घटना घडली. 25 वर्षीय संदीप सावंत यांच्या पश्‍चात गावी राहणार्‍या त्यांच्या पत्नी सविता, आई, वडील आणि इतर कुटुंबिय आहेत.


नौशेरा सेक्टरजवळ (जम्मू-काश्मीर) येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले मुंढेे (ता. कराड) गावचे सुपुत्र शहीद जवान संदीप सावंत यांचे पार्थिव आज सकाळी कराडमध्ये आल्यानंतर कराडमधील विजय दिवस चौकापासून शहीद संदीप सावंत यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मुंढे येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. भारत माता की जय, शहीद संदीप सावंत अमर रहे, अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या. साश्रुपूर्ण नयनांनी संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात आला.


बुधवारी सकाळी त्यांचे पार्थिव जम्मू येथून प्रथम दिल्लीत आणण्यात आले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव पुणे येथे आणण्यात आले. पुण्यात पार्थिव येण्यास उशीर झाल्याने शुक्रवारी पार्थिव कराडमध्ये आणण्यात आले. आज सकाळी ८ वाजता शहिद संदिप सावंत यांचे पार्थिव कराड शहरात पोहचले २५. ते ३० हजार नागरीकांनी लाडक्या संदिप ला अश्रुनयनांनी मानवंदना दिली कराड शहरातून निघालेल्या अंत्ययात्रेला कराडकरांनी दिलेल्या‌ घोषणा या अभुतपूर्व होत्या शहिद संदिप सावंत यांचे पार्थिव कराड शहर, विजय दिवस चॊक, दत्त चॊक, कोल्हापूर नाका मार्गे मुंढे येथे आण्ण्यात आले दुपारी १. वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. 


सकाळी आठ वाजता संदीप सावंत यांचे पार्थिव कराडमधील विजय दिवस चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी स्मारक, शाहू चौक, कोल्हापूर नाका, गोटे येथील नवीन बसस्टॉप, मुंढे येथील मराठी शाळा, मुंढे ग्रामपंचायत आणि चव्हाणमळा या मार्गे अंत्ययात्रा शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले. त्यानंतर मुंढे येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलातीत दाट झाडीत काही हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह पथकातले सगळे सहकारी संभाव्य धोक्यासाठी सज्ज झाले. यावेळी दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे त्यांना दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या समजू शकली नाही. मात्र संदीप सावंत आणि त्यांच्या पथकाने दहशतवाद्यांशी दोन हात करण्यास सुरुवात केली. त्यावेळी  दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा या दोघांना वीरमरण आले. आज कराड मुंढे येथील अंत्यसंस्कार वेळी १६ मराठा बटालियन्स चे ब्इगेडीयर , कर्नल , व आजी माजी सैनिक व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे यांची उपस्थिती होती