पाटण तालुक्याला लवकरच कायमस्वरूपी तहसीलदारांची नेमणूक करण्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन...माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची माहिती


पाटण तालुक्याला लवकरच कायमस्वरूपी तहसीलदारांची नेमणूक करण्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन...माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची माहिती

 

पाटण -  पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पाटण येथे कायमस्वरूपी तहसीलदारांची नेमणूक करावी अशी मागणी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. ना. थोरात यांनीही लवकरात लवकर पाटण येथे चांगल्या कायमस्वरूपी तहसीलदारांची नेमणूक केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी दिली.

 

गेल्या चार महिन्यांपासून पाटण येथील तहसीलदार यांचे पद रिक्त असून तात्पुरत्या तहसीलदार यांची नेमणूक केल्याने ग्रामीण भागातील जनतेची फार मोठी गैरसोय होत आहे. तालुक्याच्या ठिकाणी महसूल विभागाच्या संबंधित कामे करण्यासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. काही वेळेला काम होत नसल्याने दिवस वाया जातात. त्यामुळे कामे प्रलंबित राहत असून सर्वसामान्य माणसाला निष्कारण त्रास सहन करावा लागत आहे. यात तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा वेळ व पैसा दोन्ही वाया जात असून त्याची कुचंबना होत आहे.

 

त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची गैरसोय दूर होवून त्यांची वेळेत कामे होण्यासाठी येथे कायमस्वरूपी तहसीलदार असणे गरजेचे आहे. याठिकाणी कायमस्वरूपी तहसीलदार यांची नेमणूक करावी, अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केली. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मागणीनुसार लवकरच चांगल्या  कायमस्वरूपी तहसीलदार यांची नेमणूक करण्यात येईल असे आश्वासनही ना. थोरात यांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच तालुक्याला लवकरच कायमस्वरूपी तहसीलदार मिळून जनतेची कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे..!