खासदार श्रीनिवास पाटील यांचा स्व. ॲड.रावसाहेब शिंदे पुरस्काराने गौरव


खासदार श्रीनिवास पाटील यांचा स्व. ॲड.रावसाहेब शिंदे पुरस्काराने गौरव


पुणे - - खासदार श्रीनिवास पाटील यांना महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा (पुणे) यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल स्व. ॲड.रावसाहेब शिंदे पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी पेठ पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, महात्मा फुले पगडी, उपरणे आणि पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचा सन्मान करण्यात आला. 


त्यावेळी नामदार बाळासाहेब थोरात यांनी खा.पाटील हे संगमनेर मध्ये प्रांताधिकारी होते तेंव्हा पासून आम्हाला परिचयाचे आहेत त्याना आज सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देताना मला विशेष आनंद होत असल्याचे उद्गार काढले. पुरस्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले मी आजपर्यंत केलेल्या समाजसेवेची ही पावती आहे. आपण समाजाचे देणे लागतो जेव्हा आपण समाजासाठी काही करतो तेव्हा समाज आपल्यासाठी भरभरून प्रतिसाद देतो. स्व. ॲड रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा मी स्वीकार करतो.


त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्टॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष श्री.संदीप वासलेकर, श्रीमती शशिकला रावसाहेब शिंदे, श्री.भगिरथ शिंदे, डॉ.राजीव शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर भावे, यांच्यासह अन्य पुरस्कारविजेते पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे प्रशांत यशवंतराव गडाख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे कार्याध्यक्ष श्री.सचिन इटकर, अध्यक्ष उद्धव कानडे आणि उपाध्यक्ष रविंद्र डोमाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.