१९ फेब्रुवारीला दिल्लीत शिवजयंती ‘राष्ट्रोत्सव’ म्हणून साजरा होतोय.....खासदार संभाजीराजे महाराज यांनी दिली माहिती


१९ फेब्रुवारीला दिल्लीत शिवजयंती ‘राष्ट्रोत्सव’ म्हणून साजरा होतोय.....खासदार संभाजीराजे महाराज यांनी दिली माहिती


कराड दि. - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता किंवा मराठी लोकांपुरता मर्यादित न ठेवता तो संपूर्ण राष्ट्राचा उत्सव झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे स्वराज्य हे जनतेचे सुराज्य होते. खऱ्या अर्थाने संपूर्ण देशवासीयांच्या मनावर आजही शिवरायांचं अधिराज्य कायम आहे. चांगल्या पिढ्या घडवायच्या असतील तर आपल्याला शिवरायांचा इतिहास संपूर्ण देशाच्या नवीन पिढीला शिकवावा लागेल. दिल्लीच्या शिवजयंती उत्सवाला ‘राष्ट्रोत्सव’ म्हणून साजरी करतोय असे खासदार संभाजीराजे महाराज यांनी सांगितले.


शिवजयंती राष्ट्रोस्तव समिती व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांच्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी दिल्लीत  महाराष्ट्र सदन येथे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. खासदार संभाजीराजे यांनी माहीती दिली. यावेळी दादासाहेब जगदाळे, प्रवीण पाटील, गोरख पाटील, फत्तेसिंग सावंत , संजय पोवार ,धनराज घाटगे , प्रवीण पवार , अजयसिहं सावंत, धनंजय जाधव ,दीपक सपाटे , राहुल शिंदे , विश्वास काशीद ,अमर पाटील , सोमनाथ लांबोरे , विश्वास निंबाळकर, आशुतोष बेडेकर, सुजित चव्हाण आदी उपस्थितीत होते. छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी पोलंड, बुल्गेरीया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कँनडा, ट्युनिशियाश, सायप्रस या देशाचे राजदूत उपस्थित राहणार आहेत. 


खासदार संभाजीराजे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची राजधानी दिल्ली येथे गेल्या दोन वर्षापासुन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भव्य प्रमाणात साजरी करण्यात येते. यावर्षी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाहिरी कार्यक्रम, रनवाद्य वादन, लेझीम पथक, शिवकालीन युद्धकला, तुतारी वादन आदींच्या गजरामध्ये शिवजन्मकाळ साजरा होणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार व विचार जगभर पसरावेत व सर्व  देशांनी त्यांचे आचरण करावे यासाठी विविध देशांच्या राजदूतांना आमंत्रित केले असून ते शिवछत्रपतींना अभिवादन करणार आहेत. दिल्लीत साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या माध्यमातुन महाराजांचा गौरवशाली इतिहास संपुर्ण जगभरात पोहचवण्यासाठी खासदार संभाजीराजे महराज प्रयत्नशील आहेत.


ज्या महाराष्ट्राच्या मातीत शिवराय घडले त्या मातीत रुजलेल्या संस्कृतीचे दर्शन दिल्लीकरांना घडवत आहोत. दिल्लीमध्ये संपूर्ण देशातील लोक राहतात. त्यांनी पाहिले पाहिजे की महाराष्ट्र हे राज्य सांस्कृतिक दृष्ट्या फार श्रीमंत आहे. पोवाडे, ध्वज पथक, ढोल ताशा पथक, हलगी पथक, लेझीम पथक अशा अनेक पारंपरिक वाद्यांनी दिल्ली बहरून जाणार आहे. त्याचबरोबर शिवकालीन युद्धकला , मर्दानी खेळ यांचेही सादरीकरण होणार आहेत.