दिल्लीकराकडून जिद्द शिकायला हवी - डॉ. मधुकर माने



दिल्लीकराकडून जिद्द शिकायला हवी - डॉ. मधुकर माने

 



कराड - दिल्लीकराकडून आपण सर्वांनी जिद्द शिकायला पाहिजे. सकारात्मक भूमिका घेऊन केलेल्या मतदानातून केवळ विकासाला चालना मिळते,  सलग  तीन निवडणूकीत कोणत्याही भूलथापांना व कोणत्याही विषारी  प्रचाराला बळी नाही पडता,  केवल नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विचाराच्या पाठीशी राहून भागाचे,  राज्याचे आणि देशाचे कल्याण करता येते यासाठी उदासिनता झटकून घेतलेली भूमिका दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून आली. अशी माहिती डॉ. मधुकर माने यांनी दिली.

 

दिल्लीत देशातील विविध भागातील नागरिक वास्तव्य करतात. याचा अर्थ देशाचा सर्वच राज्यामध्ये विचाराचा सुद्न्यपणा आहे. याचे प्रतिबिंब दिल्लीच्या निकालात उमटू शकते तर आपल्या परीसरात का नाही ?दिल्लीकराच्या दृष्टीकोनाचा विचार करूया. आपणही आपल्या भागाच्या,  पर्यायाने राज्याच्या विकासासाठी उदासिनता झटकून कामाला लागले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. मधुकर माने यांनी केले.

 

कराड येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले, उपाध्यक्ष इम्तियाज खान , महेंद्र बाचल,सुरेश पाटील,  असिफ पठाण,  अॅड तडाखे,  तानाजीराव शिंदे,  मयुर माने,  संतोष माने,  अब्बास शिकलगार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



 


 

Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image