वर्धन अग्रोने ऊस बिल त्वरित द्यावीत अन्यथा आंदोलन... सचिन नलवडे यांचा इशारा


वर्धन अग्रोने ऊस बिल त्वरित द्यावीत अन्यथा आंदोलन...


सचिन नलवडे यांचा इशारा


 कराड : वर्धन एग्रो त्रिमली या खाजगी साखर कारखान्याला बऱ्याच शेतकऱ्यांनी 2019-20 या मागील वर्षिच्या गळीत हंगामात आपला ऊस घातला आहे. या ऊसाचे फेब्रुवारी महिन्यापासुनचे एकही बिल शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही. गेले चार महीने शेतकऱ्यांना एकही रुपया उस बिल न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची सोसायटी, पिक कर्ज थकित गेली आहेत. शेतीच्या मशागतिची, नवीन उस लागण, खते बिबियाने आणण्यासाठी शेतकऱ्यांच्याकड़े आज पैसे उपलब्ध नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे त्वरित पैसे द्यावेत अन्यथा आंदोलन केले जाईल. असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी दिला आहे.


वारंवार हेलपाटे मारुंनही पैसे न मिळाल्याने आज रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवड़े यांच्या नेतृत्वाखाली बोरगांव (ता कोरेगांव) येथील शेतकऱ्यांनी कारखान्याचे मुख्याधिकारी अजित डुबल यांना निवेदन देवून येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना संपूर्ण उस बिल देण्याची मागणी केली आहे. जर येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना संपूर्ण उस बिल मिळाले नाही. तर रयत संघटनेच्या वतीने कारखान्यावर उस बिल मिळत नाही. तोपर्यंत बेमुदत ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


यावेळी झालेल्या चर्चेत कारखान्याने येत्या आठ दिवसात बिल देण्याचे मान्य केले आहे. परंतु जर ऊसाचे पैसे आठ दिवसात मिळाले नाही. तर सचिन नलवड़े यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. असा इशारा शेतकऱ्यांनी वर्धन एग्रो कारखाना प्रशासनास दिला आहे. यावेळी बोरगांवचे शेतकरी विकास घाडगे, चंद्रकांत घाडगे, महेश गुरव, अंकुश जाधव, शंकर पवार, मनोहर घाडगे, रामदास घाडगे, वसंत निकम,बबन घाडगे उपस्थित होते