27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन

 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन


वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून यादिवशी विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, श्री.पु.भागवत पुरस्कार, डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार असे चार विशेष पुरस्कार व साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीकरिता 35 वाङ्मय पुरस्कार विशेष गौरव सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत.