कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम


कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम


कराड नगरपालिकेला ऐतिहासिक महत्त्व आहेच. त्याचबरोबर कराड नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक महिला लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना आपल्या बुद्धी कौशल्यानुसार कराड शहरातील महिलांना सर्वतोपरी सहकार्य करुन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात. महिला दिनाच्या अनुषंगाने याची दखल घेणे औचित्याचे ठरते........ गोरख तावरे


नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांच्या गतकाळातील कामाचा लेखाजोखा पाहिल्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम महिलांसाठी राबवले आहेत. कारण शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवत असताना, त्यांना प्रशिक्षण देणे, शिबिरे घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे, यामुळे कराड शहरातील महिलांचा आत्मविश्वास वाढला असून आपण आपल्या पायावर भक्कमपणे उभे राहू शकतो असा आत्मविश्वास महिलावर्गात मध्ये निर्माण झाला आहे. याचा सार्थ अभिमान कराडमधील महिलांना निश्चितपणे आहे. यासाठी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी दिलेले योगदान वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद असेच आहे.


कराड नगरपरिषद व महिला व बालकल्याण समितीच्यावतीने दरवर्षी महिलांसाठी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महिला सबलीकरण व सक्षमीकरणाचे करण्यासाठी विशिष्ट उद्दिष्टे आखण्यात आले असून त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या केली जात आहे.महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने पुढे येत आहेत. त्यांना बळ देण्याचे काम महिला व बालकल्याण समिती करीत आहे. महिलांना योग्य दिशा व संधी मिळाल्यानंतर त्या कोठेही कमी नाहीत हे सिद्ध होत आहे. यासाठी सकारात्मक प्रयत्न महिला व बालकल्याण समितीच्या वतीने केला जात आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना अभियान, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबवून याबरोबरच महिला बचत गट स्थापन करून रोजगार निर्माण केले जातात. महिला बचत गटांच्या मार्फत छोटे-छोटे लघुउद्योग निर्माण करून लघु उद्योगातून निर्माण होणाऱ्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम ही केले जात आहे. समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये महिला काम करीत असताना त्यांच्या आरोग्याची ही काळजी घेतली गेली पाहिजे याचा विचार करून महिलांसाठी सर्वरोग निदान, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते.


त्याच बरोबर महिलांना दैनंदिन जीवनामध्ये उद्योग व्यवसाय करताना ज्या अडचणी निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महिलांना पॅनकार्ड काढण्यासाठी मदत करणे, उद्योग आधारची माहिती देऊन मार्गदर्शन करणे, शॉप ॲक्ट, अन्न भेसळ परवाना हे अत्यावश्यक बाब आहे कारण कोणताही लघुउद्योग करताना शोपॅक्ट आणि अन्य देशांच्या परवाना असणे आवश्यक आहे यासाठी देखील महिलांना मार्गदर्शन केले जात आहे. शारीरिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या महिलांना ज्याप्रमाणे सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले जातात. त्याचपद्धतीने समाजामध्ये दिव्यांग महिला देखील आहेत. याचा विचार करूनच दिव्यांग ऑडिओ लायब्ररी स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दिव्यांग कल्याण अनुदान मिळवून देण्यासाठी कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती नेहमीच अग्रक्रमावर असते. दैनंदिन जीवनातील अधिक व्यापातून थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी महिलांसाठी संक्रातीनिमित्त हळदी कुंकू वाण वाटप कार्यक्रम राबवला जात आहे.


महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना कमी पडत नाहीत. अथवा त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा. यासाठी विविध कार्यक्रमांच्या आयोजना बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो.केवळ चूल आणि मूल एवढ्यापुरतेच आता महिलांचे कार्य मर्यादित राहिले नसून समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कौशल्यपूर्ण व बौद्धिक क्षमतेने महिला पुढे येत आहेत. विशेष म्हणजे कराड नगरपालिकेच्या अनेक विभागांमध्ये महिला कर्मचारी काम करत आहेत.त्यांचा मान-सन्मान सत्कार करण्याचे काम महिला व बालविकास समितीच्यावतीने स्मिता हुलवान सातत्याने करीत आहेत.


समाजातील अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. अथवा कर्त्या पुरुषाच्या कमाईवर संपूर्ण कुटुंब चालणे शक्य नाही. अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या कमाई करता यावी याकरिता ब्युटी पार्लरचे बेसिक व सुधारित कोर्सं घेतले जातात. आणि बेसिक व्यवसायाचे ज्ञान देऊन महिलांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर महिला व युवतींसाठी मराठी व इंग्रजी टंकलेखन व संगणकाचे कोर्सेस आहेत. या ठिकाणी महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण करण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेबरोबरच संगणकाचे ज्ञानही मिळावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. महिलांनी उद्योग व्यवसाय करताना वेळेत व निर्मिती केलेल्या वस्तूंचे वाटप करण्याच्या दृष्टीने त्यांना वाहन चालवता येणे आवश्यक बाब आहे. दुचाकी असो वा चारचाकी याचा विचार करूनच महिला व बालकल्याण समितीच्यावतीने कराड शहरातील त्याचबरोबर परिसरातील महिला व युवतींना दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे व देण्यात येत आहे.


कृष्णामाई महिला समुपदेशन केंद्राची स्थापना केली. महिला अत्याचारावर प्रतिबंध लावणे कमी तसेच कौटुंबिक कलह कमी होणेकामी समुपदेशन करणे अत्यावश्यक आहे ही बाब अधोरेखित करणे गरजेचे आहे कारण महिलांच्या वर सातत्याने अन्याय व अत्याचार होत असतो तो होऊ नये यासाठी समुपदेशन करणे यासाठीही पुढाकार घेतला जात आहे कौटुंबिक कलह असल्यानंतर महिलांना कुटुंबामध्ये राहताना मानसिक त्रास होतो याचा विचार करून त्यांचे समुपदेशन केले जाते. उद्योग, कर्ज बँकेची भूमिका, पंतप्रधान जीवन सुरक्षा, ज्योती विमा, मुद्रा, अटल पेन्शन योजना, कायदा साक्षरता अभियाना अंतर्गत महिलासाठी विविध कायदे, अधिकार, शासकीय योजना, विशाखा समिती, निर्भया पथक, सेव्ह चाईल्ड अभियान, बेटी बचाव बेटी पढाव अभियान, लहान मुलींसाठी गुड टच बड टच या उपक्रमांचा सह जे जे करणे शक्य आहे ते करण्यासाठी कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती कोठेही कमी पडत नाही. हे अत्यंत महत्त्वाचे व कौतुकास्पद असेच आहे.