दीड हजार ग्रामपंचायतींसाठी 29 मार्च रोजी मतदान

 


दीड हजार ग्रामपंचायतींसाठी 29 मार्च रोजी मतदान


मुंबई - राज्यातील 19 जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्च 2020 रोजी मतदान; तर 30 मार्च 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.


संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 6 ते 13 मार्च 2020 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 16 मार्च 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 18 मार्च 2020 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 29 मार्च 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतमोजणी 30 मार्च 2020 रोजी होईल.


सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 13, रायगड- 1, रत्नागिरी- 8, नाशिक- 102, जळगाव- 2, अहमनगर- 2, नंदुरबार- 38, पुणे- 6, सातारा- 2, कोल्हापूर- 4, औरंगाबाद- 7, नांदेड- 100, अमरावती- 526, अकोला- 1, यवतमाळ- 461, बुलडाणा- 1, नागपूर- 1, वर्धा- 3 आणि गडचिरोली- 296. एकूण- 1570.


Popular posts
सेवा सोसायटीनी उद्योगाला कर्ज दिले तर प्रत्येक गाव सक्षम होईल 
Image
‘कृष्णा’च्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोविड-19’च्या टेस्ट करण्यास मान्यता....आता कराडमध्येच होणार कोरोना चाचणी; सातारा जिल्यातील एकमेव प्रयोगशाळा
Image
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हद्दीवर रोखलेला कोरोना अखेर कराडमध्ये दाखल झाला....वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्यावर कारवाई करावी...कोविड कक्ष उपजिल्हा रुग्णालयाऐवजी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्याची मागणी
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्तींचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज...सबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या देणार 
राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय
Image