दौलतनगर येथील कृषी प्रदर्शनासाठी सर्व विभागांनी  समन्वय ठेवून कामे करावे - राज्यमंत्री शंभूराज देसाई


दौलतनगर येथील कृषी प्रदर्शनासाठी सर्व विभागांनी  समन्वय ठेवून कामे करावे - राज्यमंत्री शंभूराज देसाई


कराड - लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर ता. पाटण येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी कसे उपयुक्त ठरले व या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे, अशा सूचना गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केल्या.


लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथिनिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजनाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाली. यावेळी श्री. देसाई बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश झेंडे आदी उपस्थित होते.


दौलतनगर येथे आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विभागाबरोबरच इतर विभागांनीही स्टॉल उभे करुन शासनाच्या विविध योजनांची माहिती द्यावी. पाटण तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस पिक घेतात. या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल याची माहिती असणारा स्वतंत्र स्टॉल उभा करुन प्रत्यक्ष तांत्रिक दृष्ट्या ऊस पिक कसे घ्यावे याचे प्रात्यक्षिकही या प्रदर्शनामध्ये दाखविण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात यावे.


कृषी प्रदर्शनाचे मोठ्या स्वरुपात आयोजन करावयाचे असल्याने निधीसाठी प्रस्ताव कृषी विभागाने पाठवावा. निधीसाठी लवकरच कृषी मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊ असेही वित्त व नियोजन श्री. देसाई यांनी शेवटी सांगितले.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image