छ. शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे- जगदीश जगताप 


छ. शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे- जगदीश जगताप 


कराड - छत्रपती शिवाजी महाराजांनी एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य निर्मिती करत असताना बलाढ्य शत्रूंचा सामना करावा लागला. यावेळी स्वराज्यावर व कुटुंबावरही अनेक संकटे आली परंतु त्यांनी न डगमगता रयतेचे राज्य आणले.  छत्रपती शिवाजी महाराज हे जगात एकमेवाद्वितीय राजे होते. असे गौरोवोद्गार  उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी काढले. 


यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला होता. गुणवंत पाटील,  कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी,  कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर, गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, मुकेश पवार उपस्थित होते. 


महाराष्ट्राचे ‘जाणता राजे शिवराय’ पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते. त्यांचा आदर्श नव्या पिढीने घेणे आवश्यक आहे. असे आवाहन जगदीश जगताप यांनी केले. 


कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी आभार मानले. सुहास घोरपडे, प्रकाश सूर्यवंशी, प्रतापसिंह नलवडे, पंकज पाटील, अरूण पाटील, डी. टी. पाटील,  सुयोग खानविलकर, संपत पाटील, जी.बी.मोहिते, व्ही.जी.पवार, अजय दुपटे, शिवाजी बाबर, श्रीराम राजहंस, शशिकांत मोहिते यांची उपस्थिती होती. 


Popular posts
"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
विशेष मुलाखत : पुणे आयुक्त दीपक म्हैसेकर सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात करता येईल...
Image