पुणे येथील कलाकारांचे नटराज मंदिरात सुरेख भरतनाट्यम आणि कथ्थक सादर


पुणे येथील कलाकारांचे नटराज मंदिरात सुरेख भरतनाट्यम  आणि कथ्थक सादर

सातारा..पुणे येथील गुरु सौ.अमृता देवरुखकर यांच्या 14 कलाकार शिष्यांचा नटराज महाशिवरात्री संगीत,नृत्य महोत्सवात बहारदार भरतनाट्यम नृत्यांचा अविष्कार सादर झाला. 

 

या कलाकारांनी नटराज मंदिरातील परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी कला मंदंीराच्या भव्य स्टेजवर आपल्या निपुण पदलालीत्य आणी भावमुद्रांचा सुरेख नजारा दाखवत महोत्सवातील 10 व्या  भरतनाट्यम नृत्यांचा अविष्कार सादर केला. व त्यानंतर माधुरी आपटे व सहकलाकारांचे कथ्थक सादर झाले.

गुरु स्वाती दातार व गुरु प्राजक्ता माळी यांच्याकडे भरतनाट्यम्ची पंधरा वर्षे शिक्षा घेतलेल्या अमृता यांनी अलंकार पदवी पूर्ण केली असून देशातील अनेक नामांकित महोत्सवात त्यांनी कला सादर केली आहे. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात अमृता यांनी पुष्पांजलीने केली.

 

यानंतरही भीतावनम रागातील आदी तालात केलेली अलारिपू नंतर ..जय जय शंभो.. हे किर्तनम सादर झाले. त्यानंतर रसाळी रागातील ..ज्वतीस्वरम.. सादर होऊन भगवान शंकराचे शिव तांडव नृत्य प्रेक्षकांना नृत्यातून पाहायला मिळाले. राग मालिकेतील वर्णम हा शास्त्रीय प्रकार त्यानंतर देवी कौतुकं.. व चॅम्पेय हा कीर्तन प्रकार सादर होत नृसिंहकृती व ..आई गिरी नंदिनी ..या स्तोत्रावर भरतनाट्यम होत हिंदोलम रागातील श्लोक व तिल्लाना ने कार्यक्रमाची सांगता झाली.

 या कार्यक्रमात गुरु अमृता देवरुखकर यांच्यासोबत मोहिनी जाधव, अश्विनी जेधे ,राधिका पारकर , रिद्धी तळेकर ,अपूर्वा बिराजदार, रेवा गोेडे ,आदिती वाल्हेकर, श्रृती शर्मा, कनिष्का खंडेलवाल, अपूर्वा आंबाडे, जया शिवरामकृष्णन, निशिगंधा पन्हाळकर, साक्षी किरपेकर यांनी सहभाग घेतला या सर्वांचा सत्कार मंदिराचे वतीने सौ कांचन शहाणे राजश्री शिंदे उषा शानबाग यांच्या हस्ते करण्यात आला 

 त्यानंतर सादर झालेल्या कथक नृत्यसंध्याया कार्यक्रमात भारतीय परंपरेनुसार कथक नृत्य प्रस्तुतीच्या नटराजा पुढे डॉ. माधुरी आपटे यांनी सुरूवातीला शिव वंदना सादर केली वंदने नंतर डॉ. माधुरी आपटे आपल्या विद्यार्थिनीं बरोबर 14 मात्रांचा ताल धमार. ज्या मध्ये कथक परंपरेनुसार थाट, परण आमद, तोडे, तुकडे, तिहाई इत्यादीचे दर्शन घडवले. 

 

ताल प्रस्तुती नंतर नृत्यातील नृत्त पक्षामधील त्रिवट ज्यामधे पखवाजच्या बोलांवर सरसाज चढवून त्याला तालबद्ध करुन नृत्यातून सादर केले जाते.याचा नजारा दाखवत लय तालाच्या खेळाबरोबरच विविध आकर्षक स्वर-बोधगीतातून यांचे स्वरुप साकारले जाते. रंगमंचाला कॅनव्हॉस समजून  एखाद्या चित्रकाराने काढलेल्या कुंचल्यातून एखादे चित्र निघावे तसे नर्तक  विविध आकृती बंध नृत्यातून साकारले.

 

यानंतर शिव तांडव स्तोत्र (संस्कृत:शिवताण्डवस्तोत्रम्)हे शंकरांचे स्तोत्र शिवभक्त लंकाधिपती रावणाद्वारे रचण्यात आले. हीच स्तुती म्हणजे शिव तांडव स्तोत्र. ह्या शिव तांडव स्तोत्राने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि  त्यांनी रावणाला सकळ समृद्धी असणारी लंकाच नव्हे तर ज्ञान, विज्ञान तसेच अमरत्व वरदानरूपात दिले.हे बहारदार नृत्य कार्यक्रम सादर झाले. या कार्य्रंकमात  डॉ.माधुरी आपटे व त्यांच्या विद्यार्थिनी अवनती पोतनीस, विभावरी परचुरे, खुशबू जाधव, श्रुती टेके, प्रांजल सुराणा, कल्याणी देशमुख, मधुरा झांबरे, वैदाही खळदकर सहभागी झाल्या होत्या. यावेळी नटराज मंदिराचे व्यवस्थापकिय विश्‍वस्त रमेश शानभाग, व्यवस्थापक चंद्रन यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.