पोलीस जवांनासाठी सॅनिटायझर व मास्क खा. श्रीनिवास पाटील यांचेकडून जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सुपूर्द 


पोलीस जवांनासाठी सॅनिटायझर व मास्क खा. श्रीनिवास पाटील यांचेकडून जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सुपूर्द 


कराड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण सेवा बजावत असलेल्या जिल्ह्यातील पोलीस जवांनासाठी आवश्यक असणारे सॅनिटायझर व मास्क खा. श्रीनिवास पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सुपूर्द केले. श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात असून पोलीस कर्मचा-यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने त्याची आवश्यकता होती.


जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये तसेच त्या अनुशंगाने परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या कार्यासाठी रस्त्यावर उतरून चोवीस तास सेवा बजावत असलेल्या पोलिसांना खा. श्रीनिवास पाटील यांनी थेट फोन करून त्यांच्याशी संवाद साधला आहे. गेल्या चार दिवसात त्यांनी 500 हून अधिक पोलीस कर्मचा-यांशी फोनद्वारे संपर्क साधला.


सद्यस्थितीत बजावत असलेल्या सेवेबद्दल पोलीसांचे कौतुक करून खा.श्रीनिवास पाटील यांनी फोन करून त्यांचे मनोधैर्य वाढविले. त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची आपुलकीने चौकशी करत समाजाप्रती देत असलेल्या योगदानाबद्दल पोलीसांचे ऋण व्यक्त केले. याशिवाय ते कर्तव्य बजावत असताना त्यांना येत असलेल्या अडी-अडचणींचीही माहिती जाणून घेतली. माजी राज्यपाल व लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील यांचा फोन आल्याने पोलिसही मनोमन भारावून गेले. 


खा. पाटील यांनी फोन करून केलेल्या चौकशीतून पोलिसांना सध्या सॅनिटायझर व मास्कची कमतरता भासत असून त्याची गरज असल्याचे लक्षात आले. त्यामुळे सामाजिक कार्यात सहभागी राहणा-या श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने पाच लिटरचे 10 कॅन सॅनिटायझर व अडीच हजार मास्क जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील पोलीसांना पुरविण्यात आले. खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले. श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फाऊंडेशन च्या वतीने पोलीस विभागासाठी आवश्यक असलेले सॅनिटायझर व मास्क पुरविल्याने कोरोनाच्या लढ्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना वनराईतर्फे शिधावाटप
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
सातारा - पुणे महामार्गावरील खड्डे 15 मार्चपर्यंत बुजवावेत.....पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा
Image
  स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड जाहीर करावे,... डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला गंभीर धोका निर्माण झाला... "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा
Image