सोशलमिडीयामुळे समाजाचा सेतू  विस्तारला आणि पत्रकारितेपुढे आव्हान निर्माण झाले....जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटीलसोशलमिडीयामुळे समाजाचा सेतू  विस्तारला आणि पत्रकारितेपुढे आव्हान निर्माण झाले....जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील

 
फलटण - भारतीय पत्रकारितेला फार मोठा इतिहास असला तरीही तीन - चार हजार लोकसंख्या असलेल्या अनेक गावांमध्ये आजही फार कमी वर्तमानपत्रे पोहचली आहेत. ग्रामीण भागात जर विकासात्मक आणि सकारात्मक पत्रकारिता केली तर वृत्तपत्रांना त्याठिकाणी अजूनही विस्तारण्याची संधी आहे. सोशलमिडीयामुळे समाजाचा सेतू खूप मोठा विस्तारला आणि पत्रकारितेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पण त्या आव्हानांना संधीमध्ये रुपांतरीत करण्यातही पत्रकार यशस्वी झाले आहेत. आजचा काळ हा पत्रकारितेतील फार मोठा संक्रमणाचा काळ आहे. त्यामुळे या बदलत्या काळात पत्रकारांनी आता स्मार्ट फोन जर्नालिझमवर भर द्यावा, असे मत सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केले. 

 

येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 208 व्या जयंतीनिमित्त (दि.20 फेब्रुवारी) अभिवादन कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव समारंभ युवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी रविंद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, संस्थेचे प्रशासन अधिकारी व्यंकटेश देशपांडे, संस्थेचे नियामक मंडळ सदस्य प्राचार्य शांताराम आवटे, रविंद्र बर्गे, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 

युवराज पाटील पुढे म्हणाले, लोकजागृतीसाठी पत्रकारिता हे माध्यम महत्त्वाचे आहे, यासाठी बाळशास्त्रींनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरु केले. तर शिक्षण क्षेत्रासाठी ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरु केले.  त्यांनी पत्रकारिता व शिक्षण क्षेत्राबरोबरच पुरातत्त्व संशोधनातही मोलाचे काम केले आहे. स्वातंत्र्यचळवळीत पत्रकारितेचे मोलाचे योगदान आहे.  पत्रकार हा स्वातंत्र्यचळवळीचा मुळ आधार होता आणि आजही तो कायम आहे. आज माध्यम क्षेत्र मोठ्या गतीने विस्तारत आहे. भारतामध्ये सुमारे 70 हजार वर्तमानपत्र आणि नियतकालिके प्रकाशित होतात. जवळजवळ 15 कोटी लोक वर्तमानपत्र व नियकालिके विकत घेतात. आणि एक वर्तमानपत्र पाच व्यक्ती वाचतात. यावरुन माध्यमांचं महत्त्व किती आश्‍वासक आहे हे कळते. आज भारतामध्ये 400 वृत्तवाहिन्या आहेत. सोशलमिडीयाचा वापर करणार्‍यांची वाढती संख्या लक्षात घेवून पत्रकारांनी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्वीटर, यु-ट्युब आदी विविध माध्यमांच्या आधारे वृत्त प्रसारित केल्यास वाचकसंख्या वाढण्यास आणखी मदत होऊ शकते, असेही पाटील यांनी शेवटी नमूद केले. 

रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, बाळशास्त्री जांभेकरांचे पत्रकारितेबरोबरच शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय होते. त्यांच्याविषयी संशोधन कार्य करीत असताना प्रत्येक वेळी त्यांनी केलेल्या विशेष कार्याचा उलगडा होत असतो.

 

तत्कालिन ब्रिटीश राजवटीत बाळशास्त्रींनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान लाखमोलाचे आहे.  1829 मध्ये बाळशास्त्री जांभेकर ‘बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड बुक सोसायटी मुंबई’ येथे गणित अध्यापक होते. पुढे मार्च 1830 मध्ये ते डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी झाले. मार्च 1832 पासून ते पूर्णकाळ नेटिव्ह सेक्रेटरी झाले. नोव्हेंबर 1834 मध्ये एल्फिन्स्टन स्कूल मुंबई टाऊन हॉल येथे असिस्टंट प्रोफेसर झाले. त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते 1846 पर्यंत प्रोफेसर होते. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचे महत्त्व लक्षात घेवूनच संस्थेने त्यांच्या नावे माध्यमिक विद्यालय सुरु केले असल्याचे सांगून एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या नावे सुरु असलेले हे एकमेव महाविद्यालय असल्याचेही बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले. 

 

अरविंद मेहता म्हणाले, सुरुवातीच्या काळात या संस्थेला अनुदान नव्हते, साधनांची कमतरता होती मात्र या परिस्थितीवर मात करुन विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीनं शिक्षण कसे देता येईल आणि विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी कोणत्या दिशेने गेले पाहिजे त्याचा विचार करुन संस्थेने ज्ञानदानाचे व आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम केले आहे. सातत्याने विविध उपक्रम राबवून फलटण शहरात ही संस्था नावारुपाला आली आहे, असे सांगून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

 

प्रारंभी युवराज पाटील व मान्यवरांनी विद्यालयात आयोजित केलेल्या रांगोळी, हस्तकला व पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाविष्कारांचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. त्यानंतर जयंतीनिमित्त बाळशास्त्री जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शैक्षणिक वर्षातील विविध क्रिडा प्रकार व स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देवून पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले. मान्यवरांचे स्वागत आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कानिफनाथ ननावरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अरुण खरात यांनी केले तर आभार उपशिक्षक भिवा जगताप यांनी मानले. 

 

कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ सदस्य बापूसाहेब मोदी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीच्या चेअरमन सौ.अलका बेडकिहाळ, श्रीराम विद्याभवन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनिष निंबाळकर, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे उपाध्यक्ष बापुराव जगताप, पत्रकार अ‍ॅड.रोहित अहिवळे, प्रदीप चव्हाण, प्रसन्न रुद्रभटे, रोहित वाकडे, निलेश सोनवलकर यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
 


 

Popular posts
सातारा जिल्ह्यात 21 रुग्णांची नोंद.... एकूण रुग्णांची संख्या 113
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कराड वार्तापत्र - गोरख तावरे जनशक्ती आघाडीमध्ये बंड झाल्याने गटात गट निर्माण जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या विविध समितींच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने कराड नगरपालिका राजकारणात हालचालीस प्रारंभ झाला आहे. दरम्यान जनशक्ती आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या गटाला स्वतंत्र बसण्यासाठी वेगळी जागा सभागृहात द्यावी, अशी मागणी केल्याने जनशक्ती आघाडीत फूट पडली. कराड नगरपालिकेच्या राजकारणातील गटात गट निर्माण झाल्याची चर्चा संपूर्ण शहरभर सुरू आहे. दरम्यान ऐतिहासिक कराड नगरपालिका राजकारणातील आघाड्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. यापूर्वीही अनेक वेळेला नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या विचाराच्या निवडून आलेल्या आघाड्यांमध्ये बंड झाले, फूट पडली अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना 25 विरुद्ध 24 अशी सदस्य संख्या होती. दरम्यान एका सदस्याने बंड पुकारून विरोधात गेल्यामुळे सत्ताधारी गट अल्पमतात आला होता. दरम्यान मुरब्बी राजकारणी असणारे पी. डी. पाटील यांनी एका दिवसात हे बंड मोडून काढले. आपला गेलेला सदस्य पुन्हा आपल्या गटात घेऊन आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणामुळे कराड नगरपालिकेतील सत्ताधारी जनशक्ती आघाडीमध्ये फुट पडली असे बोलले जात आहे. नगरपालिका म्हटले की, गट-तट, आघाड्या, कुरबुडी, देणे घेणे असे सर्रास घडत असते. जनशक्ती आघाडी फुटली, नगरसेवक घेत असलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे फुटीचे राजकारण हा मुद्दा ऐरणीवर आला.कराड शहरासाठी विकास निधी राज्य शासनाकडून येतो. हा विकास निधी विविध कामावर खर्च करीत असताना कामाचा दर्जा बिलकुल नाही, ठेकेदार दर्जाहीन कामे करतात, हे अनेक कामे पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे. दर्जाहीन विकास कामे होत असल्याने नागरिकांची सातत्याने ओरड सुरू आहे. मात्र याकडे नगरसेवक अथवा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही.यामुळे विद्यमान सत्ताधारी गटातील नगरसेवकांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. मुख्य पदाधिकाऱ्यांसह सर्वच नगरसेवक कराड शहराच्या विकासाकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी गटात गट केलेला कायम राहणार का ? सभापतीच्या निवडीवेळी "तलवार म्यान" होणार का ? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. कारण जयवंत पाटील उपनगराध्यक्ष झाल्यापासून सत्ताधारी गटाचा सर्व कारभार जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालला आहे. दरम्यान जयवंत पाटील यांनीच बंड पुकारल्यामुळे जनशक्ती आघाडीचे काय होणार ? असा सवाल उपस्थित होत आहे. जनशक्ती आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आणि उपनगराध्यक्ष जयंवत पाटील यांनी सभागृहात वेगळी बसण्याची मागणी केली. कराड नगरपालिका राजकारणाची दिशाच बदलली आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यामध्ये समेट घडावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. विविध समितीच्या सभापतीची निवड करण्याचा अधिकार कोणाला ? आघाडीच्या अध्यक्षांना का नगरपालिकेतील गटनेत्याला ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान विविध समितीच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने आत्तापर्यंत राजेंद्र माने,महेश कांबळे, किरण पाटील यांना सभापती पदाची संधी मिळालेली नाही. यावेळेला सभापतीपदाची लॉटरी या तीन उमेद नगरसेवकांना लागेल का नाही ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कराडच्या नगरसेवकांची भूमिका संभ्रमावस्थेत राहिली होती. कोणत्या उमेदवाराला पाठिंबा कुणाला द्यायचा ? प्रचार कोणाचा करायचा ? याबाबत मात्र कराड नगरपालिकेतील नगरसेवकांचे लवकर एकमत झाले नाही. कराडच्या नगरसेवकांनी आपली भूमिका लवकर स्पष्ट केली नाही. विधानसभा निवडणुकीतील नगरसेवकांच्या भूमिकेबाबत कराडमध्ये आजही चर्चा सुरू आहे.कराड नगरपालिकेला निवडून येणार्‍या नगरसेवकांची भूमिका कराड शहराच्या विकासाबाबत संवेदनशील हवी, मात्र सध्या ती दिसून येत नाही.  नगरपालिका निवडणुकीनंतर कराड नगरपालिकेमध्ये राजकीय तीन गट अस्तित्वात आले. यामध्ये लोकशाही आघाडी विरोधात बसली आहे. भाजपाचे काही नगरसेवक निवडून आले त्यांचा एक गट आहे. त्याचबरोबर सत्ताधारी म्हणून जनशक्ती आघाडी कारभार पाहत आहे. तर भाजपच्या नगराध्यक्षा स्वतंत्रपणे आपला कारभार करीत आहेत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या पाच नगरसेवकांचा वेगळा गट निर्माण केला आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचा गट म्हणजे गटात गट निर्माण झालेला आहे. जनशक्ती आघाडीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बरोबर आता इथून पुढे आपला "घरोबा" असणार नाही असे सांगून त्यांनी कराड नगरपालिकेचा कारभार सुरू केला आहे. यशवंत विकास आघाडीचे राजेंद्रसिंह यादव यांना मांणणारे नगरसेवक आहेत. मात्र राजेंद्रसिंह यादव हे नगरपालिका राजकारणात, नगरपालिका कारभार चालवण्यासाठी जेवढा वेळ द्यायला हवा, तेवढा वेळ देत नाही, त्यामुळे नगरसेवकांनी अडचणी कोणासमोर मांडायच्या ? हा प्रश्नच आहे. अशी एकाकी पडलेले नगरसेवक आता एकत्रित सर्वांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला किती प्रतिसाद मिळेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये गटातला गट शिल्लक राहतो का ? जनशक्ती आघाडीच्या छत्रछायेखाली निवडून आलेले सर्व नगरसेवक एकत्र राहणार का ? हे काही कालावधीनंतर स्पष्ट होईल.  जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विविध समितींच्या सभापतींची निवडणूक होणार आहे. यावेळी गटातला गट अथवा जनशक्ती आघाडीची काय रणनीती राहणार हे पहावे लागेल. कराडमधील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्यासोबत महेश कांबळे, कश्मिरा इंगवले, माया भोसले, अरुणा पाटील हे नगरेसवक असल्याचा दावा केला आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे भाजपचे डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक आहेत. तर राजेंद्रसिंह यादव गट श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत. त्यामुळेच आता नगरपालिका राजकारणात काय होणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीचे 16 नगरसेवक विजयी झाले. तर या आघाडीला एका महिला नगरसेविकेने पाठिंबा दिला. दरम्यान निवडून आल्यानंतर प्रथम जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वासघात केला आणि त्यांचे नेतृत्व झुगारून दिले. कराड नगरपालिकेत भाजपाचे पाच, लोकशाही आघाडीचे सहा तर बहुमतात असलेल्या जनशक्ती आघाडीसह आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे कॉग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने असे गट कार्यरत आहेत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी राजीनामा द्यावा, असे बहुमतात असलेल्या जनशक्ती आघाडीतील काही नगरसेवकांचे म्हणणे होते. दरम्यान उपनगराध्यक्ष पाच वर्ष माझ्याकडे राहील" या अटीवर "उपनगराध्यक्षपद घेतले असल्याचे जयंतराव पाटील सांगतात. यामुळे उपनगराध्यक्ष बदलाचा प्रश्नच येत नाही. यशवंत आघाडी राजेंद्रसिंह यादव यांची, जनशक्ती आघाडी अरुण जाधव यांची तर लोकसेवा आघाडी जयवंतराव पाटील यांची आघाडी आहे. या तिघे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. जयवंत पाटील यांच्याकडे उपनगराध्यक्षपद असल्यामुळे नगरपालिकेत दररोज जयवंत पाटील दिसतात. अरुण जाधव नगरपालिकेकडे फिरकतही नाहीत. तर राजेंद्रसिंह यादव आपल्या कामाचा व्याप सांभाळून, जेवढा वेळ देता येईल तेवढाच वेळ देतात. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ते कोण सोडवणार ? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
Image
वर्धन अग्रोने ऊस बिल त्वरित द्यावीत अन्यथा आंदोलन... सचिन नलवडे यांचा इशारा
Image
चहा नव्हे अमृततुल्य, कराडच्या युवकांचा अभिनव उपक्रम......शिवनेरी अमृततुल्य
Image