दिव्यांगांना मिळणार सुविधायुक्त युनिक कार्ड दिव्यांगांसाठी देशभरात असणार एकच युनिट कार्ड


दिव्यांगांना मिळणार सुविधायुक्त युनिक कार्ड
दिव्यांगांसाठी देशभरात असणार एकच युनिट कार्ड


कराड - दिव्यांगांना आता रंगीत युनिक कार्ड (ओळखपत्र) मिळणार आहे. केंद्र शासनाच्यावतीने दिव्यांगांना "कार्ड एक-सुविधा अनेक" याअंतर्गत अनेक सुविधायुक्त "युनिक आयडी कार्ड" मिळणार आहे. हे कार्ड देशात कोठेही चालणार असून सर्व सोयी-सवलतीसाठी त्याचा वापर होणार असल्याची माहिती दिव्यांग व्यक्ती मार्गदर्शक संदिप घाडगे यांनी दिली.


दिव्यांगांना युनिक आयडी कार्ड मिळणार आहे. केंद्र शासनाच्यावतीने सुरू झालेल्या युनिक कार्ड , UDID , स्वावलंबन कार्ड , वैश्विक कार्ड ही तीन नावे दिली आहेत. या आयडी कार्डच्या सुविधेतून ही माहिती पुढे येणार आहे. दिव्यांगांना एस्.टी, रेल्वे , विमान व इतर सर्व शासकीय योजनांचा फायदा "युनिक कार्ड" द्वारे नक्कीच मिळणार आहे. "कार्ड एक - फायदे अनेक" हे रंगीत कार्ड आधार कार्डप्रमाणे देशात एकच असणार आहे. आधार कार्ड युनिक कार्डशी "लिंक" असेल फोटोसह पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, दिव्यांग प्रकार / टक्केवारी मोबाईल क्रमांकासह इतर माहिती कार्डवर असणार आहे. त्यामुळे हे कार्ड म्हणजे दिव्यांगांसाठी एक महत्वाचा " ऐवज" ठरणार आहे.


संदिप घाडगे म्हणाले, केंद्र शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आमच्याकडे युनिक कार्ड UDID साठी सवलतीमधे ऑनलाईन नावनोंदणी सुरू असून दिव्यांगांना युनिक फॉर्म अपलोड करण्यासाठी बराच वेळ वाया जात आहे. त्याप्रमाणे ऑनलाईन माहिती भरणाऱ्या केंद्राकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत होती. दिव्यांग मार्गदर्शक संदिपसर यांनी महाराष्ट्रातील दिव्यांगांना ही सुविधा सोप्या पध्दतीने व शारिरीक व आर्थिक त्रास वाचविण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. 


आता दिव्यांगांना युनिक ओळखपत्रांसाठी अनेक कार्यालयांची उंबरठे झिजविण्याची गरज पडणार नाही. दिव्यांगांना वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी कार्डाची आवश्यकता लागत होती. यामधे एस.टी पास, रेल्वे पास आदि ठिकाणी दिव्यांगांना वेगवेगळी ओळखपत्र दाखवण्याची गरज पडत होती. युनिक कार्ड हे दिव्यांगांचे 21 प्रकारांचे "प्रमाण" दर्शविणार आहे. ऑनलाईन युनिक आयडी कार्ड फॉर्म भरल्यानंतर केंद्र शासन यांच्या कामकाजानुसार ओरिजनल युनिक कार्ड पोस्टाद्वारे घरपोच मिळेल. कोणत्याही शासकीय योजनेची घाई नसावी.धीर धरा, युनिक कार्ड नक्कीच मिळेल अशी ग्वाही संदिप घाडगे यांनी दिव्यांगांना दिले आहे.


युनिक कार्डवर दिव्यांगांना संपूर्ण देशात कोठेही लाभ घेता येणार आहे. यामुळे देशातील दिव्यांगांची संख्या त्याची टक्केवारी आदि माहिती यानिमित्ताने एकत्रितरित्या होणार आहे. यासाठी आजच दिव्यांगांनी नवीन ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि दिव्यांग युनिक कार्डसाठी लागणारा वैयक्तीक युनिकआयडी माहिती फॉर्म सोबत ओरिजिनल ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, सही / अंगठा स्कँन करून जीपीजीमधे फोटो आदी माहिती दिव्यांग मार्गदर्शक संदिप घाडगे (9604108633) यांच्याकडे वाटस्अँप नंबरवर पाठवावीत. असे आवाहन करण्यात आले आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांनी सातत्याने राज्यावर होणारे आक्रमण थोपविले आणि त्यांनी जगाला दाखवून दिले राजा कशा प्रकारचा असावा. महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या विचाराने पुढे जाणारे हे सरकार आहे. अशी प्रतिक्रिया सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.