व्हिएसआयच्या विश्वस्तपदी डॉ. इंद्रजीत मोहितेंची तिसऱ्यांदा फेरनिवड


व्हिएसआयच्या विश्वस्तपदी डॉ. इंद्रजीत मोहितेंची तिसऱ्यांदा फेरनिवड


कराड - मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हिएसआय) या संस्थेच्या विश्वस्तपदी रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांची तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. व्हिएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या सभेत डॉ. इंद्रजीत मोहिते यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्ष व मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत निवड झाली.


डॉ. इंद्रजीत मोहिते यांचे वडील महाराष्ट्राचे थोर विचारवंत व माजी मंत्री यशवंतराव मोहिते हे संस्थेच्या स्थापनेपासून विश्वस्तपदी कार्यरत होते. 2007 साली यशवंतराव मोहिते यांच्याऐवजी विश्वस्तपदावर शरद पवार यांनी डॉ. इंद्रजीत मोहिते यांना संधी दिली. याच कालावधीत महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष, राज्य डिस्टिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणून डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्याकडे शरद पवार यांनी जबाबदारी सोपवली होती. 2010 साली विश्वस्तपदाचा निर्धारीत कालावधी संपल्याने डॉ. मोहिते यांची दुसऱ्यांदा निवड केली.


डॉ. मोहिते यांनी मिळालेल्या संधीतून प्रत्येक पातळीवर आपल्या अभ्यासू व जिज्ञासू कार्याची छाप उमटवली आहे. व्हिएसआय या संस्थेत दर तीन वर्षानंतर ऊस क्षेत्राशी निगडित आंतरराष्ट्रीय परिषदांचे नियोजन केले जाते. नुकतीच गेल्या आठवड्यात एक परिषद झाली. डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी या परिषदेसह दोन परिषदांचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. 


Popular posts
"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
विशेष मुलाखत : पुणे आयुक्त दीपक म्हैसेकर सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात करता येईल...
Image