कराड येथे लिंगायत तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

कराड येथे लिंगायत तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा


कराड - लिंगायत तेली समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधुवर व पालक स्नेहमेळावा रविवार १ मार्च रोजी सकाळी ९ वाजलेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण बहुउद्येशीय हॉल (कराड येथे आजोजित केला आहे. 


समाजाचा सर्वांगीण विकास, उत्कर्ष, प्रगती त्याचे वेभव हा खरा धर्माचा हेतू, अल्पवेळेत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उपयुक्तता हाच या मेळाव्यचा उद्येश, सर्वांनी एकत्र यावे. एकमेकांना भेटावे, स्नेह वाढवावा तो वृध्दिगत व्हावा, स्नेहसंबंध जुळावेत, नवीन नाती निर्माण व्हवीत हाच ध्यास प्रतीक्षा आहे. सर्वांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे. इच्छुक वधु-वरासह पालकांनी प्रत्यक्ष वेळेवर उपस्थित राहून वधु - वर पालक परिचय मेळावा यशस्वी करावा व मुला-मुलीची नोंदणी जास्तीत जास्त संख्येने करावी असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


गतवर्षी ६५० हून जास्ती उपवर वधूवरांनी नांव नोंदण्याचा विक्रम घडविला असून यावर्षी स्नेहमेळावाचे उधिष्ट मोठेप्रमाणात आहे तरी सर्व समाजबांधवांनी उपस्थितीत राहावे. असे आवाहन सातारा जिल्हा संपर्क. डॉ. सुधाकर बेंद्रे, सातारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप मुंढेकर, कराड तालुकाध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय तारळेकर, कराड शहर अध्यक्ष रविंद्र मुंढेकर यांनी केले आहे.