हॉकर्स झोनची जागा निश्चित करुन झाला लकी ड्रॉ 

 


हॉकर्स झोनची जागा निश्चित करुन झाला लकी ड्रॉ 


कराड  - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कराड शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न अखेर निकालात निघाला आहे. नगरपालिका व हातगाडा संघटनेच्यावतीने निश्चित केलेल्या जागेत 98 हातगाडाधारकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून जागेचे वाटप करण्यात आले.जागेची निश्चिती करण्यासाठी हातगाडे चालकांच्या नावाची चिठ्ठी टाकून सोडत केली गेली. दरम्यान हॉकर्स झोनच्या जागेत हातगाडा चालक व्यवसाय करण्यास सुरवात करणार असल्याचे हातगाडा संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले.


कराड शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व हातगाडाधारकांचा बायोमेट्रीक सर्व्हे करण्यात आला आहे. दरम्यान, 26 फेब्रुवारीपासून पालिकेने शहरात धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्याने सर्व हातगाडे बंद ठेवण्यात आले होते. अनेक दिवस हातगाडे बंद राहिल्याने हातगाडा चालकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे पालिकेने तातडीने हॉकर्स झोनची निर्मिती करण्याची मागणी हातगाडा संघटनेकडून होत होती.


नगरपालिका व हातगाडा संघटनेच्या माध्यमातून बसस्थानक परिसरातील डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुतळय़ाच्या पाठीमागील जागा, नवग्रह मंदिर परिसर, थाटबाट हॉटेलसमोरील जागा व टाऊन हॉल परिसर या चार जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. या जागेत आखणी करण्यात आली होती. लकी ड्रॉ च्या माध्यमातून हातगाडा चालकांना जागा वाटप केले आहे. जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, सभापती विजय वाटेगावकर, गजेंद्र कांबळे, राहुल खराडे मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरअभियंता ए. आर. पवार, हातगाडा संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी, आनंदराव लादे, उपाध्यक्ष सतीश तावरे, सचिव हरीभाऊ बल्लाळ, गजाभाऊ कुंभार अधिकारी, कर्मचारी व हातगाडाधारक उपस्थित होते.


रोजीरोटीचा प्रश्न सुटला


अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यापासून गोरगरीब हॉकर्सचे व्यवसाय बंद होते. गोरगरिबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता तर हातगाडा संघटनेत जागेबाबत एकमत होत नव्हते. अखेर अंतिम निर्णय झाल्यानंतर सोडत घ्यायचीच, असा निर्णय राजेंद्रसिंह यादव यांनी घेतला.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कराडचा 35 वर्षीय तरुण कोरोना बाधितासह जिल्ह्यात 3 कोरोना बाधित; 18 रिपोर्ट निगेटिव्ह.....2 एप्रिल रोजी सायं. 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड19 ) आकडेवारी
Image
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव 
Image
शहरी व ग्रामीण क्षेत्रातील कंपन्यांना...अटी व शर्तीवर उद्योग सुरु करण्यास परवानगी...जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image