"कृष्णा"त 100 दिवसांत तब्बल 8 लाख 21 हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप.....प्रतिदिन 115 टक्क्यांहून अधिक गाळप वेग; सरासरी 12.60 टक्के उतारा


"कृष्णा"त 100 दिवसांत तब्बल 8 लाख 21 हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप.....प्रतिदिन 115 टक्क्यांहून अधिक गाळप वेग; सरासरी 12.60 टक्के उतारा


कराड  - य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात अवघ्या 100 दिवसांत 8,21,040 मेट्रीक टन इतके विक्रमी गाळप केले आहे. नियोजनबद्ध कारभारामुळे हे विक्रमी गाळप झाले असून, गाळपाचा प्रतिदिन वेग 115 टक्क्यांहून अधिक आहे. तर सरासरी साखर उतारा 12.60 टक्के राहिलेला आहे.


पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे यंदा सर्वच साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होण्यास विलंब झाला. कृष्णा कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ झाला. उशिरा हंगाम सुरू झाला असला तरी कारखाना प्रशासनाच्या तोडणीच्या योग्य नियोजनामुळे कारखान्याकडे नियमितिपणे ऊसपुरवठा होत राहिला. डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने केलेल्या योग्य आखणीमुळे कारखाना प्रतिदिन पूर्ण क्षमतेने चालविण्यातही प्रशासनाला यश आले. याचीच परिणिती म्हणून यंदाच्या हंगामात जिल्ह्यात कृष्णा कारखाना गळीतासह सरासरी साखर उताऱ्यातही अव्वलस्थानी राहिला आहे.


कृष्णा कारखान्याचा हंगाम सुरू होऊन 100 दिवस पूर्ण झाले. कारखान्याने प्रतिदिन सरासरी सुमारे 8235 मेट्रीक टनाहून अधिक क्षमतेने एकूण 8 लाख 21 हजार 40 मे. टन इतके विक्रमी गाळप केले. तसेच आजअखेर 10 लाख 29 हजार 130 क्विंटल साखर पोती उत्पादित केली असून, सरासरी साखर उतारा 12.60 टक्के आहे.


डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने यापूर्वीही विक्रमी गाळप केले. गतवर्षी 18 मार्चला कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात 9100 मे. टन इतके विक्रमी गाळप करण्याचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. गेल्या पाच वर्षांत कारखाना कामकाजात पारदर्शकता, आर्थिक शिस्त, शेतकी विभागाने नियोजनबद्ध तोडणी यंत्रणा, यांत्रिकीकरणावर भर, हार्वेस्टर मशिनने सुसज्ज केल्याने, शेतकऱ्यांनाही वेळेत तोड मिळत आहे. सर्व नियोजनामुळे विक्रमी गाळपाची परंपरा कृष्णा कारखान्याने कायम राखली आहे.


इथेनॉलचेही विक्रमी उत्पादन


डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्षांपूर्वी 65 केएलपीडी क्षमतेचा नवा डिस्टलरी प्रकल्प सुरू झाला. डिस्टलरीच्या माध्यमातून बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलची निर्मिती करण्यात आला. आजवरच्या इतिहासात अनोखा विक्रम नोंद झाली आहे. एका दिवसात कारखान्याला बी हेवी मोलॅसिसपासून तब्बल 1 लाख 10 हजार 941 लिटर रेक्टीफाईड स्पिरीटची निर्मिती करण्यात यश आले आहे.