सभासदांच्या प्रगतीसाठी डॉ. सुरेश भोसले यांचे नेतृत्व पुन्हा हवे माणिकराव पाटील : कृष्णा कारखान्यात 11,11,111 व्या साखर पोत्याचे पूजन


सभासदांच्या प्रगतीसाठी डॉ.सुरेश भोसले यांचे नेतृत्व पुन्हा हवे


माणिकराव पाटील : कृष्णा कारखान्यात 


11,11,111 व्या साखर पोत्याचे पूजन


कराड -  कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी गेल्या 5 वर्षात सभासदांना दिलेला प्रत्येक शब्द प्रामाणिकपणे पाळला आणि कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. आज त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच कारखाना प्रगतीपथावर असून, भविष्यातही शेतकरी सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी डॉ. सुरेश भोसले यांचेच नेतृत्व कृष्णा कारखान्यावर हवे, असे प्रतिपादन राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यात या हंगामात उत्पादित झालेल्या 11 लाख 11 हजार 111 व्या साखर पोत्याच्या पूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते.


 कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार हा कार्यक्रम साधेपणाने घेण्यात आला. राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील आणि महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम यांच्या हस्ते साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, निवासराव थोरात, गुणवंतराव पाटील, अमोल गुरव, जितेंद्र पाटील, संजय पाटील, पांडुरंग होनमाने, सुजीत मोरे, गिरीश पाटील, दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.


राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या मार्गदर्शनातून आम्ही घडलो. त्यांच्याच कार्यकर्तृत्वाचा वारसा डॉ. सुरेश भोसले चालवित आहेत. त्यांनी आपल्या पारदर्शक कारभाराने कारखान्याला उर्जितावस्था दिली असून, त्याच्या नेतृत्वावर सभासदांचा ठाम विश्‍वास आहे. विनम्रता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष गुण असून, सभासद व कारखान्याच्या उज्वल भवितव्यासाठी अशा नेतृत्वाला पुन्हा संधी देण्याची गरज आहे. राजकारणात निवडणुका आल्या की विरोधकांकडून नेमके मुद्दे सोडून अन्य मुद्यावरच चर्चा भरकटविली जाते. पण सभासद सूज्ञ असल्याने ते असल्या अपप्रचाराला बळी पडत नाही. शेतकर्‍यांच्या नावावर परस्पर कर्जे घेऊन त्यांना देशोधडीला लावणार्‍यांना या भागातील सभासद शेतकरी निवडून देत नाही, अशी टीका त्यांनी विरोधकांचे नाव न घेता केली.


पैलवान आप्पासाहेब कदम यांनीही कारखान्याच्या चढत्या आलेखाचे कौतुक करत गेल्यावेळी सत्तांतर होऊन सुरेशबाबा चेअरमन झाले नसते तर आज हा कारखाना बंद पडला असता आणि सामान्य शेतकरी सभासद व कामगार देशोधडीला लागला असता, असे नमूद केले. कारखान्याची ही प्रगती बघून सभासदांनी खरंतर बिनविरोध निवडणूक करायला पाहिजे होती. पण काही प्रवृत्तींना वातावरण दूषित करायची सवय असल्यानेच निवडणुकीची वेळ येते, असेही ते म्हणाले.


अध्यक्षस्थानवरून बोलताना चेअरमन डॉ. भोसले यांनी कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेतला. सध्या साखर कारखानदारी अडचणीत असतानाही आपण कृष्णा कारखाना यशस्वीपणे चालवून गाळप, उतारा, दर, उत्पादन अशा सर्वच पातळीवर आघाडीवर आहोत. शिस्तबद्ध कारभारातून आपण कारखान्याच्या बहुतांश कर्जाची परतफेड केली असून, कारखाना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आणण्यात यशस्वी झालो आहोत. भविष्यात बँकांच्या आर्थिक मदतीशिवाय सभासदांना एफआरपी देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.


कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार