सातारा जिल्ह्यातील 14 महिन्याच्या बालकास अनुमानित रुग्ण म्हणून  दाखल

सातारा जिल्ह्यातील 14 महिन्याच्या बालकास अनुमानित रुग्ण म्हणून  दाखल


  सातारा :  सातारा जिल्ह्यातील 14 महिन्याच्या बालकास  ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने बालरोग तज्ञ यांच्या सल्ल्यानुसार अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.