पोलीस खात्यातील जिल्ह्यातील पहिला पंप सुरू


पोलीस खात्यातील जिल्ह्यातील पहिला पंप सुरू


कराड - कार्वे रोडवरील पोलीस वसाहतीत पोलीस दलाचा जिल्हय़ातील पहिला पेट्रोलपंप साकारला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून पोलिसांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करत आदर्श घालून दिला. विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक तेजस्विनी पाटील, अवर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते.


कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे समारंभ टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे. त्यामुळे पेट्रोल पंपाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घेण्यात आला. मोजकेच अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निमंत्रण प्रसारमाध्यमांसह अन्य नागरिकांना, पोलीस कर्मचारी, कुटुंबीय यांना देण्यात आलेले नव्हते.