कारागृह बंदी अरुल अरुणाचलम मुरगम यांच्या मृत्यूची 24 मार्चला दंडाधिकारी चौकशी

कारागृह बंदी अरुल अरुणाचलम मुरगम यांच्या मृत्यूची 24 मार्चला दंडाधिकारी चौकशी


 मुंबई - कारागृहात बंदी असलेले अरुल अरुणाचलम मुरगम हे दि. 9 मे, 2019 रोजी  मृत्यू पावले. या घटनेची दंडाधिकारी  चौकशी  शुक्रवार, दि.24 मार्च, 2020 रोजी दुपारी 2 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, तळमजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई -400001 या ठिकाणी  होणार आहे. 


या घटनेसंदर्भात कोणास काही म्हणणे मांडायचे असेल, त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहरच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.