'कोरोना'संदर्भात महापालिका आयुक्तांच्या नावाने फेक मेसेज, एकावर गुन्हा 


'कोरोना'संदर्भात महापालिका आयुक्तांच्या नावाने फेक मेसेज, एकावर गुन्हा 


पिंपरी, - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने कोरोना संदर्भात सोशल मीडियावर फेक मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी एकावर पिंपरी पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.21) रोजी घडला होता. 


याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा यशवंत बोदडे (वय 46) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फेसबुक अकाउंटधारक दिपक एस वाघ (पूर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 21 मार्च रोजी फेसबुक अकाउंटवर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा संदेश, नमस्कार मी तुम्हाला विनंती करतो की आज रात्री दहा वाजल्यानंतर आणि उद्या सकाळी पाच वाजेपर्यंत घर सोडू नका, कोरोना विषाणू मारण्यासाठी औषधाची हवेत फवारणी होत असल्याने आपल्या सर्व नातेवाईक, मित्रांना ही माहिती द्या. धन्यवाद पिंपरी महापालिका आयुक्त अशी पोस्ट आयुक्तांनी केल्याचे भासविले. महापालिकेची परवानगी न घेता खोटी, बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याने नागरिकांच्या मनात कोरोनाविषयी भिती निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.