पाटण तालुक्यात ९  अभ्यासिका होणार.... १ कोटी ३५ लाख निधी मंजुर


पाटण तालुक्यात ९  अभ्यासिका होणार
१ कोटी ३५ लाख निधी मंजुर


कराड  - पाटण तालुक्यातील  मातंग व बौध्द वस्त्यांमध्ये मागासवर्गीय समाजातील शालेय, महाविद्यालयीन युवक, युवतींना अभ्यास करणेकरीता हक्काची जागा उपलब्ध व्हावी याकरीता अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारण्याच्या कामांना १ कोटी ३५ लाखांचा निधी मंजुर दिला आहे. प्रत्येक अभ्यासिकेकरीता १५ लाखप्रमाणे ९ गावात अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत.


 मातंग व बौध्द समाजातील शालेय, महाविद्यालयीन युवक-युवतींना अभ्यास करणेकरीता हक्काची व स्वतंत्र्य अशी जागा उपलब्ध करुन त्याठिकाणी अभ्यासिका उभारण्याचा उपक्रम ना.शंभूराज देसाईंनी मागील वर्षी गतवर्षात ७ गावांमध्ये ही योजना राबविली. चालू वर्षे नऊ गावांमध्ये अभ्यासिका बांधण्यात येणार आहेत.


नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत अभ्यासिका बांधणेची कामे प्रस्तावित करण्यात आली होती.त्यानुसार पाटण मतदारसंघातील कोकीसरे, गोकूळ तर्फ पाटण, वेताळवाडी, जळव, कोरिवळे येथील बौद्धवस्तीत तर घोट, क्रांतीनगर नाडे, चोपदारवाडी, नाटोशी या गावातील मातंगवस्ती अभ्यासिका बांधकामाकरिता प्रत्येकी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामांना प्रशासकीय मान्यतेचे आदेश जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती यांचेमार्फत देण्यात आले आहेत. लवकरच या कामांच्या निविदा प्रसिध्द होवून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल असा विश्वास राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे. या अभ्यासिकेंचा लाभ मातंग व बौध्दवस्त्यांमधील युवक- युवतींना होणार असल्याचे शंभूराज देसाईंनी सांगितले.