अतिक्रमण हटावचे कौतुक.... मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा सत्कार


अतिक्रमण हटावचे कौतुक.... मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा सत्कार


कराड - कराडमधील अतिक्रमणाबाबत आरोपांची राळ उठली असतानाच मंडईतील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा यथोचित सत्कार करून अतिक्रमण मोहिमेचे कौतुक केले आहे. अतिक्रमण म्हटल्यामुळे कराडमधील रस्ते मोठे झाल्याच्या भावनाही या व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेचे कौतुक करणारे माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांच्यासह मंडईतील व्यापारी प्रथम ठरले आहेत.


अनेक दिवसांपासून असलेली अतिक्रमणे हटविली गेल्याने व्यापार्‍यांना त्यांचा फायदा होत असून चांगली सोयी- सुविधा निर्माण झाल्या आहेत. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केलेली कारवाई योग्य असून चांगल्या कामाचा गौरव करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याने आम्ही त्यांचा सत्कार करत असल्याचे माजी उपनगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांनी सांगितले. 


कराड नगरपालिकेत मंगळवारी मुख्याधिकार्‍यांचा शाल, श्रीफळ व बुके देवून सत्कार करण्यात आला. यावेळी रोप पठाण, फिरोज बागवान, तौफिक मुल्ला, रियाज बेपारी, साजिद मुल्ला आदी उपस्थित होते.