घरी परतताना काळाने घातला घाला

घरी परतताना काळाने घातला घाला


कराड - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या धास्तीनेच, कोल्हापूरच्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहुन मुळ गावी शाहूवाडीकडे येताना, दुचाकी घसरून कराड येथे झालेल्या अपघातात आई-वडिलांसह चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.


मूळचे जांबुर (ता.शाहूवाडी) येथील सर्जेराव भीमराव पाटील (३३) हे कामानिमित्त मुंबई डोंबिवली येथे परिवारासह राहतात.कोरोनाच्या धास्तीने ते पत्नी पुनम (२७) आणि मुलगा अभय (७) यांना दुचाकीवरून मंगळवार (दि.२४) रोजी गावी येत होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ त्यांची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचार सुरू असताना तिघांचाही मृत्यू झाला.


कोरोनाच्या धास्तीने तसेच रोजगारही नसल्याने,अनेक जण मिळेल त्या वाहनाने तसेच मैलोनमैल पायपीट करीत मुळगावी जात आहेत.पाटील कुटुंबीयही आपल्या गावी येत असताना,काळाने त्यांच्यावर घाला घातला.या अपघाताचा धक्का कुटुंबीयांना बसला असून,परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image