डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची शिकवण अज्ञान नष्ट करणारी - सुरेश चव्हाण  


डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची शिकवण अज्ञान नष्ट करणारी - सुरेश चव्हाण  


पाटण - प्राथमिक शाळा व महाराष्ट्रभुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग) यांच्या संयुक्त विदयमाने मारुल हवेली (ता. पाटण) येथील कार्यक्रमप्रसंगी प्राथमिक शाळेच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या थोर समाजप्रबोधनकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचा अनावरण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. 


साडेतीनशे वर्षापुर्वीचा समर्थ विचारांचा वारसा नानासाहेबांच्या रूपाने अवतरला आहे. प्रपंच उत्तमाचा व्हावा,समाज घडविण्यासाठी समर्थ चळवळ महत्वपुर्ण ठरत आहे. नानासाहेबांची शिकवण काळाची गरज असुन समाजाला दिशा देण्याचे कार्य करत आहे. अभिमानाला छेद देऊन सर्वांमध्ये एकोपा उभी करणारी शिकवण आहे. प्रतिष्ठानच् माध्यमातुन समाजसेवा म्हणजेच ईश्वरी कार्य सुरू आहे. प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असुन महाराष्ट्रभुषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जगभरात व्यापकतेने उभी केलेली संतशिकवण व त्यांचे समाजहितपयोगी उपक्रम पाहता देशाला प्रगतीपथावर नेणारी आहे. संतशिकवणुकीतले संस्कार उभे करत उच्च - नीच, गरीब -श्रीमंत भेद संपवत मानवता हाच धर्म आणि मनुष्य हीच जात अशी स्वदेव, स्वदेश, स्वधर्म या त्रिसुत्रीला धरून व्यापक शिकवण आहे. सदृढ शरीर व सदृढ मनाने श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातुन आत्मिक सुख मिळत असुन या शिकवणुकीतील श्रवणभकती समाजाचे व्यक्तीमत्व घडवत आहे. असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. 


दरम्यान या कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी सारंग श्रीनिवास पाटील ( अध्यक्ष माहिती तंत्रज्ञान विभाग ), प्रशांत थोरात ( नायब तहसिलदार पाटण ), नितीन जगताप ( गट शिक्षण अधिकारी पाटण), विजय विभूते ( सहाय्यक गटविकास अधिकारी पं.स. पाटण ), आर.बी. पाटील ( आरोग्य अधिकारी ), एस.व्ही शिंदे पोलिस उपनिरीक्षक (मल्हार पेठ ), अशोक पाटील ( चेअरमन बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना ), अशोक मगरे ( सरपंच ), प्रकाश जाधव ( उपसरपंच ),मधुकर पाटील ( ग्रामसेवक ), सुरेश चव्हाण ( केंद्रप्रमुख ), प्रकाश पानस्कर ( मुख्याध्यापक ) आदी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान या सोहळया प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य , ज्येष्ठ व्यकती , ग्रामस्थ, दोन हजारांपर्यंत सदस्य उपस्थित होते.


कार्यक्रमप्रसंगी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन समाज प्रबोधन तसेच अनेकविध वृक्षारोपण , स्वच्छता अभियानासारखे अनेक सामाजिक उपक्रम हे गौरवास्पद आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या शिकवणुकीतुन दिली जाणारी शिकवण पाहता अज्ञान नष्ट करून देणारी आहे. निश्चितच पुढील पिढीसाठी या शिकवणुकीचा फायदा होत आहे. मनुष्य हीच एकमेव जात व मानवता धर्माची शिकवण खऱ्या अर्थाने प्रतिष्ठानच्या माध्यमातुन मिळत आहे असे केंद्रप्रमुख सुरेश चव्हाण बोलत यांनी सांगितले.


दरम्यान अशोक पाटील म्हणाले की, निस्वार्थ कार्य करणारी परंपरा असुन संपुर्ण जगाने याचा आदर्श घेण्यासारखा आहे.कल्याणकारी कार्याचा वसा संपुर्ण जगभरात सर्वसामान्य व तळागाळापर्यंत पोहचवणे हे कार्य बैठकीच्या माध्यमातुन होत आहे. तसेच अनेक समाजपयोगी उपक्रम महाराष्ट्र भुषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संस्थापक पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने रायगड भुषण सचिन दादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, राहुल दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न होत आहे.नियोजन, स्वच्छता, स्वयंशिस्त तसेच व्यवस्थापन पाहता प्रतिष्ठानचे कार्य गौरस्वापद आहे


श्रीसमर्थ बैठकीच्या माध्यमातुन सुदृढ , निरोगी, निष्पाप व वैचारिक अधिष्ठान असलेली पिढी घडविण्याचे कार्य थोर समाजप्रबोधनकार महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केले. जगात एकमेव सशकत समाजमन घडविणारे ठिकाण म्हणुन श्री समर्थ बैठकच होय. अध्यात्मातुन समाज प्रबोधनाचे कार्य खऱ्या अर्थाने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान करत आहे. त्यामध्ये युवकांचा सहभाग देखील लक्षणीय आहे. 


महाराष्ट्रभुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य आज पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगडभूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातुन अखंडीतपणे सुरू असून त्यांच्या या सामाजिक कार्यात राहुलदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी यांची मोलाची साथ लाभत आहे.


रेवदंडा ता. अलिबाग येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गरीब - गरजूंना शालेय साहित्य वाटप, मुक- बधीर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप,रकतदान शिबीरे, मोफत आरोग्य तपासणी, बेरोजगार युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वाहन परवाना काढून नोकरीची संधी, प्रौढ शिक्षण, पाणपोई, प्रवाशांसाठी बस थांबा, तलावातील गाळ काढणे, तैलचित्रातुन समाजप्रबोधन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, जलपुनर्भरण, निर्माल्यापासुन खत निर्मिती, स्मशानभुमी व दफनभूमी स्वच्छता अभियान, आपत्कालीन पुर परिस्थितीत सहाय्यता, ज्येष्ठ नागरिक, वय -अधिवास दाखले वाटप असे अनेकविध उपक्रम प्रतिष्ठानमार्फत आजपर्यंत यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. नवी मुंबई येथील आरोग्य शिबीराची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. या कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानांतर्गत पदमश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची राज्यपाल नियुक्त स्वच्छता दुतपदी निवड झालेली आहे.


गावात प्रारंभ करतानाच सर्वत्र रांगोळीचा सडा पाहुन संपुर्ण गावातील वातावरण प्रसन्न ,आनंदी पाहावयास मिळत होते. तसेच ठिकठिकाणी सदस्य हात जोडून उभे राहून मान्यवरांचे स्वागत करतानाचे चित्र पाहून हात जोडायला लावणारी महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी , रायगड भुषण सचिनदादा धर्माधिकारी यांची शिकवण सर्वश्रेष्ठ आहे तसेच कार्यक्रमातील शिस्त पाहुन सर्व प्रमुख पाहुण्यांनी कौतुकाचा, शुभेच्छांचा वर्षाव केला.


मारूल हवेली प्राथमिक शाळा येथे महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरण सोहळया प्रसंगी कार्यक्रमातील सुसुत्रता, शिस्तबद्धता पाहुन मान्यवरांनी कौतुक केले. आत्तापर्यंत आम्ही एवढे कार्यक्रम पाहिले परंतु या कार्यक्रमातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहता ,न उलगडणारे गुढच आहे. निश्चितच समर्थविचारातुन हे तेज प्राप्त झालेले आहे. असे गौरवोदगार प्रमुख पाहुण्यांनी काढले. 


यापुर्वी सातारा जिल्ह्यातील मारूल हवेली ता. पाटण, नेले,अंबवडे बु॥ता. सातारा, पुसेगाव , सोमर्डी, प्रभुचीवाडी ता. जावळी, विक्रांतनगर ता. सातारा येथील ग्रामपंचायत कार्यालयात तसेच महाबळेश्वर नगरपरिषदेच्या कार्यालयात, प्रभुचीवाडी प्राथमिक शाळेत महाराष्ट्र भुषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आहे.