कोरोना अनुमानित एका युवकाला शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल

कोरोना अनुमानित एका युवकाला शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल


  सातारा  : चिली या देशातून  प्रवास करुन आलेला सातारा जिल्ह्यातील 34 वर्षीय  युवकाला जिल्हा रुग्णालयात कोविड-19 चा  अनुमानित रुग्ण म्हणून आज दाखल करण्यात आले आहे. त्याला सर्दी असल्याने  सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे.   त्याच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.