सातारा - कागल सहापदरीकरण "टोलवसुली" मध्ये अडकले


सातारा - कागल सहापदरीकरण "टोलवसुली" मध्ये अडकले


रस्ता सहापदरीकरणाची तयारी रस्ते विकास महामंडळाने दर्शविली आणि पुणे ते सातारा सहापदरीकरण राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत केला. दरम्यान सातारा ते कागलपर्यंतचा रस्ता सहापदरीकरण पूर्ण केल्यास टोलची वसुली कोण करणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सातारा ते कागलपर्यंतच्या रस्त्यासाठी निविदा प्रसिद्ध होते. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय होत नाही. "टोल" ची वसुली कोणी करायची ? यासाठी सहा चौपदरीकरण रस्त्याचे काम रखडले आहे.


पुणे ते बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागल या 133 किलोमीटर लांबीच्या सहापदरी रस्त्याचे काम रखडले आहे. गेल्या 2 वर्षांत निविदेला 23 वेळा मुदतवाढ दिली. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी निविदा होत असल्याने रस्ता कधी होणार अशी विचारणा होत आहे. पुणे ते सातारा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.


महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यातील अंतर्गत वादामुळे टोल वसुलीच्या मुद्यावरून या निविदेला वारंवार मुदतवाढ देण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून होत आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग दुपदरीकरण काम 2002 मध्ये पूर्ण झाले. चारपदरीकरण काम 2005 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. आता सहापदरीकरण काम 2022 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. दरम्यान निविदेला वारंवार मुदतवाढ देत असल्यामुळे सदर रस्त्याचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


पुणे ते बंगलोर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले. राज्य रस्ते विकास महामंडळाला या रस्त्यावर 2022 पर्यंत टोलवसुली करण्याची मुदत दिली. त्याचवेळी किणी (कोल्हापूर) आणि तासवडे (सातारा) हे दोन टोलनाके करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील रस्त्याची मालकी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. त्यामुळे 2014 साली या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत सुरू झाले. पण कर्नाटकातील व महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दर्जाबाबत तुलना झाली. त्यामुळे पुणे-सातारा सहापदरीकरण टीकेचे लक्ष झाल्याने पुढील सातारा ते कागलपर्यंतचे सहापदरीकरण रखडले. या कामाची निविदा वारंवार प्रसिद्ध झाली, प्रतिसादही मिळाला पण वरिष्ठ पातळीवर निविदा खुल्या झाल्याच नाहीत. 


महाराष्ट्रातील दुपदरी व चारपदरी रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाने केला, यामुळे 2022 पर्यंत टोल आकारणी करता येणार आहे. रस्ता सहापदरीकरणाची तयारी रस्ते विकास महामंडळाने दर्शविली.आणि पुणे ते सातारा सहापदरीकरण राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत केला. दरम्यान सातारा ते कागलपर्यंतचा रस्ता सहापदरीकरण पूर्ण केल्यास टोलची वसुली कोण करणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सातारा ते कागलपर्यंतच्या रस्त्यासाठी निविदा प्रसिद्ध होते. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय होत नाही. "टोल" ची वसुली कोणी करायची ? यासाठी सहा चौपदरीकरण रस्त्याचे काम रखडले आहे.


सहापदरीकरण जलदगतीने व्हावे


निविदेला मुदतवाढ मिळत असल्याने हे काम केव्हा पूर्ण होणार ? निविदेचा अंतिम निर्णय कधी होणार ? असे प्रश्न अधिकार्‍यांसह ठेकेदारांपुढे पडले आहेत. महाराष्ट्रातील दुपदरी व चारपदरी रस्त्यांचे आता सहापदरीकरण होणार आहे. रस्ते जलदगतीने व्हावेत अशीच सामान्य जनतेची इच्छा आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image