लग्नात जपली सामाजिक बांधिलकी डाकेवाडीतील चिंचुलकर कुटूंबीयांची शाळेसाठी आर्थिक मदत


लग्नात जपली सामाजिक बांधिलकी
डाकेवाडीतील चिंचुलकर कुटूंबीयांची शाळेसाठी आर्थिक मदत


कराड - पाटण तालुक्यातील डाकेवाडी - काळगांव येथील आनंदा चिंचुलकर आणि परिवाराने लग्नसमारंभादिवशी जि.प.प्राथ.शाळेसाठी आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावरील कोरोनाचे सावट तसेच लग्नातील अनावश्यक खर्च टाळून चिंचुलकर कुटूंबियांनी लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. अत्यल्प स्वकीयांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला.


‘एक हाक माझ्या शाळेसाठी’ असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट डाकेवाडी यांच्यावीने डाॅ.संदीप डाकवे यांनी केले होते. त्यानुसार लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी इतर भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शाळेला भौतिक सुविधांची तसेच आर्थिक मदतीची गरज असल्याचे मुख्याध्यापक महादेव गेजगे, उपशिक्षक रणजित शिंदे यांनी केले आहे. आपण ज्या शाळेत शिकलो, आपलाही यात काही सहभाग असावा या हेतूने आनंदा विठ्ठल चिंचुलकर आणि परिवाराने मुलगा कृष्णा आणि आनंदा पांडूरंग चाळके यांची कन्या स्वाती यांच्या विवाहानिमित्त आर्थिक मदत देणगी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडे सुपुर्द केली.


यावेळी शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अधिक डाकवे, विकास डाकवे, आनंद डाकवे, नवनाथ जाधव, शिवाजी डाकवे, विकास जाधव, पंढरीनाथ दुधडे, रविंद्र डाकवे, अंकुश डाकवे, शंकर चिंचुलकर, दिलीप डाकवे, भिमा डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते. आपल्या आनंदाच्या प्रसंगी गावातील मुलांच्या शिक्षणासाठीमदत व्हावी यासाठी सहकार्य करणा-या आनंदा चिंचुलकर परिवाराच्या कृतीचे कौतुक होत आहे. 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image