सातारा जिल्ह्यातील संगणकीय सातबारा नोंदीचे ९६.३३ टक्के काम पूर्ण .....महाबळेश्वर, जावळी, कराड तालुके आघाडीवर


सातारा जिल्ह्यातील संगणकीय सातबारा नोंदीचे ९६.३३ टक्के काम पूर्ण .....महाबळेश्वर, जावळी, कराड तालुके आघाडीवर


कराड - ऑनलाईन सातबारा नोंदणी करण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर जोरदारपणे सुरू असून महाबळेश्वर, जावली, कराड तालुके आघाडीवर आहेत. 98 टक्के ऑनलाइन सातबारा नोंदणीचे काम या तालुक्यांमध्ये पूर्ण झाले आहे. सातारा जिल्ह्यात अकरा तालुके असून ऑनलाईन सातबारा काम पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवरून केला जात आहे. हस्तलिखित सातबारे हे ऑनलाइन करण्याचे काम तलाठी, मंडलधिकारी आणि तहसीलदार कार्यालयामार्फत केले जात आहे.कराड तालुक्यातील काम जलद गतीने सुरू असून लवकरच शंभर टक्के काम पूर्ण होईल असे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले.


राज्य सरकारने निर्णय घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचे सातबारा उतारे ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू केली. यानुसार सातारा जिल्ह्यात हे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान सातबारा ऑनलाइन नोंदणीमध्ये वारंवार सुधारणा होत असल्याने 100% काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही.सातबारा ऑनलाइन करताना तीन - चार हंगामाची माहिती भरण्यात आली आहे. हस्तलिखित सातबारा हा ऑनलाइन करताना शेतकऱ्यांचे नाव, कब्जेदार, शेतजमीन क्षेत्र, आणेवारी ही ऑनलाइन सातबारावर हेक्टर व आरमध्ये घेतली जात आहे. दरम्यान या ऑनलाईन नोंदीमध्ये काही चूक झाल्यास त्यामध्ये दुरुस्तीही करण्यात येत आहे


महाराष्ट्र शासनाने शेतक-यांना तत्काळ ७/१२ व ८ अ ऊतारा मिळावा यासाठी संगणक प्रणालीचा वापर करून ऑनलाइन सातबारा देण्याचा उपक्रम राबवला आहे. यामुळे वरिष्ठ कार्यालयातील अधिका-यांनी मंडलाधिकारी व तलाठी यांना हस्तलिखित सातबारा हा ऑनलाइन करण्याचे उद्दिष्ट दिले. असंख्य तलाठ्यांना संगणकावरील कामकाजाची माहिती व प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. शंभर टक्के ऑनलाइन ७/१२ पूर्ण करण्याचे काम सातारा जिल्हाभर वेगात सुरू आहे. शासनाने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून एकाच ठिकाणी तत्काळ कामे होत असल्याने सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले. 


सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण चालू सर्वे नंबर व डाटा साईन केलेल्या सातबाराची संख्या, कंसात दिलेला आकडा हे काम पूर्ण झालेले आहेत. - महाबळेश्वर ४६२८४ (४५६६१), पाटण २२२५१०(२१४१२७), कराड १९८२५९(१९४५१०), वाई ९९८३८(९६३८८), खंडाळा ७०८०१(६५१८९), फलटण ११६४६९(११२७३९), माण ११६१५५(१३७९३२), खटाव १४६१५५(१३७९३२), कोरेगाव ११०८९९(१०७५०९), जावली ९७२७६(९६०३२), सातारा २०९०३७(२०२२८६). सातारा जिल्ह्यातील एकूण सर्वे नंबर १४ लाख ३१ हजार ८४२ पैकी १३ लाख ७९ हजार २७९ डाटा साईन केलेले सातबारा उतारे पूर्ण झाले आहेत.दरम्यान ५२ हजार ५६३ सर्वे नंबर नोंद करण्याचे बाकी असून 96.33% सातारा जिल्ह्यातील संगणकीय सातबारा नोंदीचे काम पूर्ण झाले आहे.


सातबारा दुरुस्ती एका दिवसात


महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा १९६६ च्या कलम १५५ अन्वये चूक दुरूस्ती करण्याचा आदेश तहसीलदार त्यांच्या स्तरावर काढतात. याकामी संबधित शेतकऱ्यांनी तालुका तहसील कार्यालयात १५५ अन्वये अर्ज दाखल करावयाचा आहे. प्रस्तुतच्या १५५ चे आदेशाची अंमलबजावणी फक्त एकाच दिवसात करणेसाठी तलाठी व मंडलाधिकारी यांना सूचना आहेत.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image