सोमवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम  मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची माहिती


सोमवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम 
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची माहिती


कराड - कराड नगरपालिकेने सुरू केलेली अतिक्रमण मोहीम रविवारी सुट्टीमुळे बंद ठेवण्यात आली दरम्यान सोमवारपासून पुन्हा मोहीम सुरू होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. दरम्यान अतिक्रमणांचा धसका कराडकरांनी घेतला असून स्वतःहून अतिक्रमण काढण्याची हालचाली संपूर्ण शहरात दिसून येत आहेत.


सोमवारी पोपटभाई पेट्रोल पंप ते भेदा चौक, छ. संभाजी भाजी मार्केट परिसर, रेव्हेन्यू क्लब ते भेदा चौक, कर्मवीर भाऊराव पुतळा ते बापूजी साळुंके पुतळा ते महात्मा फुले पुतळा ते आंबडेकर चौक ते जोतिबा मंदिर आणि मंडई परिसरातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. दरम्यान अतिक्रमण काढण्यासंबंधी संबंधितांना कोणते अतिक्रमण आहे. कुठे आहे त्याची कल्पना देण्याचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अतिक्रमण काढणार आहोत त्या ठिकाणी मार्किंग करून घेणे, नागरिकांना याबाबत आवाहन करणे बाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


दरम्यान अतिक्रमणात नुकसान झाले आहे. त्या व्यापारी व कराडकर नागरिकानी दुरुस्तीचे काम सुरू केल्याचे दिसून येत आहे. मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिकांचे व्यवसायिक गाळ्याच्या समोरील पायऱ्या या गटावर असल्यामुळे त्या उद्ध्वस्त केल्या आहेत. छोटे लोखंडी जुने व तोडफोडीचे दुरुस्ती करून अनेक व्यवसायिकांनी व्यवसाय पुन्हा सुरू केला असून बेमुदत कराड बंद व्यापार्‍यानी मागे घेतले आहे