उत्तम नियोजनामूळे "सह्याद्रि" कारखाना अग्रेसर - जिल्हाधिकारी शेखर सिंह


उत्तम नियोजनामूळे "सह्याद्रि" कारखाना अग्रेसर - जिल्हाधिकारी शेखर सिंह


कराड - सह्याद्रि सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य साखर कारखाना आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक मंडळ व खातेप्रमुख यांच्या अत्यंत काटेकोर नियोजनाने चाललेला कारभार हा कौतुकास्पद असून, या नियोजनामूळे सह्याद्रि कारखाना अग्रेसर असल्याचे मत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केले.


सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20 या गळीत हंगामात उत्पादीत झालेल्या 10 लाख 25 हजार 550 वरील 11 पोत्यांच्या पूजन समारंभ प्रसंगी बोलत होते. संचालक मानसिंग जगदाळे व जशराज पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष लक्ष्मी गायकवाड, संचालक, अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.


जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, यापूर्वी गडचिरोली येथे कार्यरत होतो. तेथे भात व धान्य शेती मोठया प्रमाणावर होते. त्यामूळे ऊस शेतीबद्दल जास्त महिती नाही. परंतू सातारा जिल्हयामधे जास्त प्रमानावर उस क्षेत्र असल्यामूळे व सह्याद्रि सारखा अग्रेसर कारखाना या जिल्हयात असल्यामूळे उस शेती व कारखानदारीत येणार्‍या अडी-अडचणी येवू नये म्हणून केलेले उत्तम नियोजन याची माहिती घेता आली.


यावेळी जनरल मॅनेजर पी.आर.यादव यांनी प्रास्ताविक करून कारखान्याची प्रतिदिन 1250 मे.टनापासून 7500 मे.टनापर्यंत व नियोजित 11000 मे.टनाची विस्तारवाढ, शैक्षणिक सुविधा, दुष्काळ ग्रस्तांना सहाय्य, घरकुल योजना, विहीर बोअरींग योजना, गोबर गॅस योजना, पाणंद रस्ते सुधारणा योजना, जलयुक्त शिवार अभियानात सहभाग, गो-पैदास केंद्रे, कुस्ती कलेस वाव मिळावा म्हणून कारखाना कार्यस्थळावर मानधनावरील कुस्ती स्पर्धा, कंम्पोस्ट खत निर्मिती प्रकल्प, सभासद व अधिकारी कर्मचारी यांचेकरीता प्रशिक्षण वर्ग व मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, उपसा जलसिंचन योजना, स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या कराड स्मारकासाठीची आर्थिक मदत आदिबाबत सविस्तर माहिती दिली. आभार संचालक मानसिंग जगदाळे यांनी मानले.Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image