कराड : निबंध व चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती 


कराड : निबंध व चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती 


कराड- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बैठकीतील आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र 1 मे पर्यंत सिंगल युज प्लॅस्टिकमुक्त करणेचे निर्देश देणेत आले. याअनुषंगाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना शहर प्लॅस्टिक मुक्त करणे अनिवार्य आहे. मलकापूर शहरामध्ये नगरपरिषदेच्यावतीने होर्डिंग्स, प्रबोधनपर बैठका, प्रभात फेरी, घंटागाडी अनाऊसिंग, शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये चित्रकला - निबंध स्पर्धा यांचे माध्यमातून जनजागृती अभियान राबविले जात आहे. 


नूतन मराठी प्राथमिक विद्यालय येथे चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेस 1 ली ते 4 थी व 5 वी ते 9 वी या दोन वयोगटातील सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी निबंध व चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकमुक्त मलकापूर, हरित मलकापूर या विषयांवर निबंधाच्या माध्यमातून अनेक नाविण्यपुर्ण विचार मांडले. चित्रकलेच्या माध्यमातून उत्कृष्ट मलकापूर शहराविषयी रेखांकन व रंगकाम यातून विद्यार्थ्यांनी अनमोल विचार मांडले. स्पर्धेतून दोन वयोगटात प्रथम 3 पारितोषिके देण्यात आली.


वयोगट - 1 ली ते 4 थी, निबंध स्पर्धा, अक्षरा कुंभार, सायली बाबर, आर्या पवार. चित्रकला स्पर्धा, निकीता वारे, वरदराज काळे, ऋुतीका लोकर. निबंध स्पर्धा, वयोगट :- 5 वी ते 9 वी - वृषभ यादव, सबिना बुराण,नम्रता शिंदे. चित्रकला स्पर्धा, विश्वकर्मा, स्वरा उराडे, कृतिका पवार यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.


नगराध्यक्षा निलम धनंजय येडगे यांनी प्लॅस्टिक वापरामुळे होणारे दुष्परिणाम व पर्यावरणाचा ऱ्हास याची माहिती दिली. मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सिंगल युज प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र याबाबत असणारे शासनाचे धोरण स्पष्ट केले. नगरसेविका गीतांजली पाटील, स्वाती समीर तुपे, कमल कुराडे, पुजा चव्हाण, माधुरी पवार, निर्मला काशिद, शकुंतला शिंगण, नुतन मराठी प्राथमिक विद्यालयाचे संचालिका लता शिंदे, मुख्याध्यापक आनंदा पाटील, शिक्षक, शहर समन्वयक पुंडलिक ढगे उपस्थित होते.