संगीत-नाटक महोत्सव मोठया उत्साहात पार


संगीत-नाटक महोत्सव मोठया उत्साहात पार


     कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाटयष्शास्त्र विभागाच्यावतीने आयोजित' केलेला संगीत-नाटक महोत्सव मोठया उत्साहात पार पाडला. कार्यक्रमाचे उद्धाटन ज्येष्ठ नाटककार, लेखक संभाजी सावंत, मुंबई यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मराठी भाषा विभागाचे विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक संगीत व नाटयशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.श्रीमती अंजली निगवेकर यांनी केेले. प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री. विकास कांबळे यांनी तर अध्यक्षांचा परिचय अतुल परीट यांनी करून दिला.  डॉ.राजश्री खटावकर यांनी आभार मानले.


    महोत्सवाच्या प्रथम सत्रामध्ये ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्ऱ्शक संभाजी सावंत, मुंबई यांचे 'नाटयकलेचे बदलते स्वरूप' या विषयावर व्याख्यान झाले.त्याप्रसंगी त्यांनी नाटयनिर्मितीच्या उगमापासून ते आजच्या एकूणच रंगभूमीचा आढावा घेतला.त्याचबरोबर नाटकाची भाषा, बोलीभाषा व प्रमाणभाषा याबद्दलही उपस्थितांना मार्गदर्ऱ्शन  केले. त्यानंतर ज्ञानेश मुळे  दिग्दर्ऱ्शित 'तोच चंद्रमा नभात' या एकांकीकेचे  नाटयशास्त्र विभागाच्या विदयार्थ्यांनी  सादरीकरण केले. या एकांकीकेचे नेपथ्य डौं.संजय तोडकर यांनी केले होते.


   महोत्सवाच्या दुस-या सत्रामध्ये प्रसिध्द गायक डॉ.शषांक मक्तेदार, गोवा यांचे बहारदार शास्त्रीय गायन झाले. ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या तालमींचा त्रिवेणी संगम त्यांच्या गायनातून रसिकांना अनुभवता आला. त्यांना तबलासाथ विभागाचे निखील भगत तर हार्मोनिअम साथ अमित साळोखे यांनी केली. कलाकारांचा परिचय विभागाचे डॉ.विनोद ठाकूरदेसाई यांनी करून दिला. या महोत्सवाला शहारातील प्रतिष्ठीत रसिक, विभागाचे विदयार्थी व सर्व शॢक्षक व शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते. या महोत्सवाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, उपकुलगुरू डॉ डी.टी.शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर,  वित्त व लेखाधिकारी व्ही.टी.पाटील, यांचे बहुमोल मार्गदर्ऱ्शन लाभले.