महिला बचत गटांची शाश्‍वत उद्योग उभारणी - स्मिता हुलवान


महिला बचत गटांची शाश्‍वत उद्योग उभारणी - स्मिता हुलवान


कराड - आजअखेर महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून विकास म्हणजे रोजगार हा उद्देश नजरेसमोर ठेवून राबविण्यात आलेले मिनी बँक संकल्पना, महिलांसाठी कायम स्वरूपी विक्री गाळे, महिला बचत गटांच्या शाश्‍वत उपजिवीकेसाठी शहरामध्ये विविध उद्योगांची उभारणी केली असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी दिली.


कराड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समिती व दिनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान यांचे संयुक्त विद्यमाने कराड शहरातील महिलांसाठी भव्य "कराड महिला महोत्सव' यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे संपन्न झाला. महिला बचत गटांच्या वस्तू व सेवानां मागणी निर्माण व्हावी या उद्देशाने महिला बचत गटांच्या विक्री स्टॉलचे उद्घाटन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे हस्ते, आणि महिला व बालकल्याण समिती सभापती स्मिता हुलवान यांच्या अध्यक्षेतेखाली पाणी पुरवठा समीती सभापती आशाताई मुळे,उपसभापती अर्चना ढेकळे, शारदाताई जाधव, माया भोसले, सुप्रिया खराडे, विद्या पावसकर,अंजली कुंभार, सुनंदा शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


स्मिता हुलवान यांनी प्रास्ताविकात आर्थिक व्यवस्थापनाचे तंञ समजून घेऊन आर्थिकदृष्टया सक्षम झालेल्या माशाअल्लाह, विघ्नहर्ता, शाकंबरी, सरस्वती, संकल्प, दिक्षा, प्रतिमा, मोहब्बते, दुर्गा, प्रज्ञा महिला बचत गट या 10 महिला बचत गटांना "उत्कृष्ट बचत गट- मिनी बँक पुरस्कार'' तर शहरी व ग्रामीण भागातून तालुका स्तरावर नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहित करून स्टार्ट-अप संस्कृतीचा विकास करण्यासाठी "हिरकणी - नवउद्योजक महाराष्ट्राची'' म्हणून निवड झालेबद्दल यशस्वीनी, अरमान, नूतन महिला बचत गटांचा गौरव करण्यात आला.


दुसच्या सञात शहर समृध्दी उत्सव अंतर्गत महिलांसाठी बँक प्रतिनिधींच्या माध्यमातून शासकिय योजना, कर्जाबाबत बँकांची भूमिका आणि आर्थिक व्यवस्थापनातून आर्थिक साक्षरता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शहरी गरीब लाभाथ्र्यांना वैयक्तिक कर्ज, बचत गट कर्ज व समुह कर्ज देऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या सहकार्य केल्याबद्दल विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक मोहसीन शिरगुपे, 
आय डी बी आय बँकचे व्यवस्थापक श्री. आर्य, कॅनरा बँके च्याकृषी अधिकारी स्वाती पाटील, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कराड यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. व्यवसायासाठी आवश्यक असणारी कागदपञे पॅन कार्ड, उद्योग आधार, शॉप अॅक्ट परवाना, अन्न भेसळ परवाना तसेच इ दस्तऐवज काढण्यासाठी सहकार्य करण्यात आले.


सुत्रसंचालन गीतांजली यादव यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश जाधव, अंजना कुंभार, प्रमोद जगदाळे यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन दिपाली दिवटे यांनी केले.