रिक्षास्टॉप व रिक्षांबाबत निर्णय घेताना विश्वासात घ्या...कराड तालुका रिक्षा कृती समितीचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन....सूचना व हरकती मागविणार - मुख्याधिकारी यशवंत डांगे


रिक्षास्टॉप व रिक्षांबाबत निर्णय घेताना विश्वासात घ्या...कराड तालुका रिक्षा कृती समितीचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन....सूचना व हरकती मागविणार - मुख्याधिकारी यशवंत डांगे


कराड - कराड बसस्थानक नजीक एकच रिक्षा गेट करण्याच्या संबंधाने कराड तालुका रिक्षा कृती समितीच्यावतीने मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान बस स्थानकानजीक रिक्षा स्टॉप संबंधाने सूचना प्रसिद्ध करून सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.


बस स्थानकानजीक असणारे रिक्षां स्टॉप हलवून, एस.टी. स्टॅण्ड पाठीमागे स्मशानभूमी लगत एकच रिक्षा स्टॉप केला जाणार असलेबाबत समजले. सध्या असलेले सर्व रिक्षा स्टॉप हे पोलीस प्रशासन, आर.टी. ओ. अधिकारी, नगरपालिका प्रशासन व रिक्षा संघटना व त्यांचे पदाधिकारी यांचे संयुक्त एकविचाराने निश्चित केलेले आहेत.याबाबतची नोंद नगरपालिका दप्तरी आहे. रिक्षा हा अतिक्रमणाचा भाग नसून जनतेच्या सेवेचे एक वाहन आहे. असे निवेदनात म्हटले आहे.


रिक्षा चालकांनी बॅच बिल्ला, परमीट काढून शासनाचे लायसन्स घेवून रिक्षा व्यवसाय करतात. सदर व्यवसायातून एक रिक्षा धारक विविध करांच्या माध्यमातुन सुमारे १२,०००/- रुपये इतका शासकीय कर भरत आहे. एस.टी.प्रवासी इन गेट आऊट गेट जवळ रिक्षा सोडून कोणत्याही वाहनास कायद्याने उभे करण्याची परवानगी नाही. याच ठिकाणी रिक्षा व्यवसाय होत असतो. महाराष्ट्रात सर्व एस.टी. स्टॅण्डवर प्रवासी इन आऊट गेट जवळच रिक्षा स्टॉप असलेचे दिसून येत आहे. अशाच प्रकारची मोहिम सन २००० साली विद्यमान उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी स्वच्छ कराड, सुंदर कराड या योजनेअंतर्गत एस.टी. स्टॅण्ड परिसरातील खोकी धारकांचे स्थंलातर खॉजा दर्गा येथे केले होते. ते व्यवसायाचे ठिकाण नसलेने तेच खोकीधारक पुन्हा एस.टी. स्टॅण्ड परिसरात हातगाड्या रुपाने रस्त्यावर आलेले आहे. 


प्रवाश्याच्या सोयीसाठी फुटपाथचे आतील बाजुस रिक्षा स्टॉप निश्चित केले होते. तरी कृपया त्याच प्रमाणे प्रवाश्यांचे सोयीचा विचार करुन आज एस.टी. स्टॅण्ड परिसरात जे रिक्षा स्टॉप आहेत. ते त्याच जागेवर कायमपणे निश्चित करावेत. अशी मागणी निवेदनात करण्यात आले असून नगरपालिकेने हॉकर्स झोन मंजूर केला आहे. ज्यांच्याकडे नगरपालिकेचे हातगाडा लायसन्स आहेत, ज्यांचे आधारकार्ड, रहिवाशी दाखले, रेशनकार्ड असेल त्यांनाच त्यामध्ये सहभागी करावे. अनागोंदीने अनेक हातगाडे रस्त्यावर असतात, त्यामुळे होणारे वाहतुकीच्या अडथळ्याचा दोष मात्र रिक्षा धारकांना दिला जात आहे. तसेच रिक्षा स्टॉप अथवा रिक्षांबाबत कोणताही निर्णय घेतेवेळी कराड तालुका रिक्षा कृती समितीस विचारात घ्यावे. कराड शहरातील स्थानिक नागरिकांच्या व रिक्षा व्यवसायिकांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने पुढील आंदोलन उभारले जाईल याची नोंद घ्यावी. सदर निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असेही निवेदनात म्हटले आहे.


निवेदनावर धर्मवीर संभाजीराजे रिक्षा युनियनचे मुसा शेख, अजंठा रिक्षा युनियनचे विनायक मोरे, जय महाराष्ट्र रिक्षा युनियनचे बबलू मुल्ला, क्रांती रिक्षा युनियनचे बाजीराव सूर्यवंशी, शिवशक्ती रिक्षा युनियनचे विजय सूर्यवंशी, कर्मवीर भाऊराव पाटील रिक्षा युनियनचे इम्रान मडकी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदनाची प्रत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली आहे.


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image